Gaslight : सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीचा 'गॅसलाइट' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या रिलीज डेट...
Gaslight : सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीचा 'गॅसलाइट' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
![Gaslight : सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीचा 'गॅसलाइट' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या रिलीज डेट... Gaslight Sara Ali Khan Vikrant Massey Chitrangada Singh Murder Mystery to Premiere on Disney plus Hotstar on March 31 Gaslight : सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीचा 'गॅसलाइट' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या रिलीज डेट...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/ce4fba70a1f5e7b13c52db7215110e6e1678104309351254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sara Ali Khan Vikrant Massey Release Date : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) 'गॅसलाइट' (Gaslight) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पण आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
'गॅसलाइट' कधी होणार प्रदर्शित? (Gaslight Release Date)
सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीचा 'गॅसलाइट' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 31 मार्च 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पवन कृपलानीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सारा अली खान आणि विक्रांतसह चित्रांगदा सिंहदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर असणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
डिज्नी प्लस हॉटस्टारने एक व्हिडीओ शेअर करत 'गॅसलाइट'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. या व्हिडीओमध्ये सारा अली खान आपल्या आजीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. दरम्यान 'गॅसलाइट'ची घोषणा होते. 'गॅसलाइट' या सिनेमाचं शूटिंग राजकोटमध्ये झालं आहे. सारा आणि विक्रांतचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
सारा अली खानने 'गॅसलाइट'ची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"कल्पना करा की तुम्ही लिफ्टमध्ये अडकले आहात आणि अचानक दिवे गेलेत. जनरेटरदेखील नाही. दरम्यान तुमच्यासोबत तुमच्या हक्काची कंपनीदेखील नाही". सारा अली खानच्या या पोस्टवर आता सिनेमाची प्रतीक्षा, थरार-नाट्यची मेजवानी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
सारा अली खानचे आगामी सिनेमे
सारा अली खानचा 'गॅसलाइट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच तिचे 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक', 'जगन शक्ति' आणि 'लक्ष्मण उतरेकर' हे सिनेमेदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर दुसरीकडे विक्रांत मेस्सी 'जिगरी यार', 'मुंबईकर','सेक्टर 36' आणि फिर आई हसीन दिलरुबा' सारख्या सिनेमांत झळकणार आहे.
संबंधित बातम्या
Entertainment News Live Updates 06 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)