एक्स्प्लोर
'संजू'ने इतिहास रचला, रविवारी 'बाहुबली 2' चाही विक्रम मोडला
'संजू'ने पहिल्या तीन दिवसात एकूण 120.6 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी 34.75 कोटी, शनिवारी 38.60 कोटी रुपये आणि रविवारी विक्रमी 46.71 कोटींची कमाई केली आहे.
मुंबई : अभिनेता संजय दत्तचा बायोपिक 'संजू'ने बॉक्स ऑफिसवर रविवारी बाहुबली 2 या सिनेमाचाही विक्रम मोडला. 'संजू'ने रविवारी 46.71 कोटींची कमाई केली. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम बाहुबली 2 (46.50 कोटी) च्या नावावर होता.
'संजू'ने पहिल्या तीन दिवसात एकूण 120.6 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी 34.75 कोटी, शनिवारी 38.60 कोटी रुपये आणि रविवारी विक्रमी 46.71 कोटींची कमाई केली आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात एका दिवसात एवढी कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा आहे.
वीकेंडला कमाई करणारे या वर्षातील टॉप 5 सिनेमे
संजू : 120.6 कोटी
पद्मावत : 114 कोटी (बुधवार प्रीव्ह्यू शो, आणि गुरुवारी रिलीज)
रेस 3 : 106.47 कोटी
बाघी 2 : 73.10 कोटी
रेड : 41.01 कोटी
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे.
2018 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'संजू'ने सलमान खानचा 'रेस 3', टायगर श्रॉफचा 'बागी 2' आणि दीपिका-रणवीरच्या 'पद्मावत' या सिनेमांना अगोदरच मागे टाकलं होतं.
सलमान खानच्या 'रेस-3' ने पहिल्या दिवशी 29.17 कोटी, 'बागी-2' ने 25.10 कोटी कमावले होते. चौथ्या क्रमांकावर 'पद्मावत' (19 कोटी) तर पाचव्या क्रमांकावर 'वीरे दी वेडिंग (10.70 कोटी) आहे.
नॉन हॉलिडे (बँक हॉलिडे नसलेल्या शुक्रवारी) प्रदर्शित होऊन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही संजूने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बॉलिवूडच्या इतिहासात 'संजू' हा नॉन हॉलिडेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. 'बाहुबली' (122 कोटी) हा या यादीतील अव्वल चित्रपट आहे.
रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रणवीरच्या चित्रपटांमध्ये 'बेशरम'ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement