एक्स्प्लोर
VIDEO: अजय-अतुलही झाले सैराट, झिंगाटवर तुफानी डान्स!
मुंबई: सध्या अवघा महाराष्ट्र फक्त एकाच गाण्यावर थिरकतो आहे. ते म्हणजे अजय-अतुलच्या झिंग झिंग झिंगाटवर... दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमातील या गाण्यानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
झालं झिंग झिंग झिंगाट.. हे गाणं वाजू लागताच तरुणांपासून आबालवृद्धांपर्यत सगळेच यावर ठेका धरु लागतात. संगीतकार अजय-अतुलच्या या गाण्याची जादूच तशी आहे म्हणा.
आजवर अजय-अतुल यांच्या गाण्यांनी अनेकांना ताल धरायला लावला आहे. पण यंदा पहिल्यांदाच हे दोघंही आपल्याच गाण्यावर बेधुंद होऊन नाचत होते.
काय खरं वाटत नाही ना? सैराट सिनेमातीला गाण्यांच्या लाँचिंगच्या निमित्तानं अवघी सैराटची टीम झिंग झिंग झिंगाटवर थिरकली. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अजय-अतुल यांनी तर अक्षरश: तुफानी डान्स केला.
स्वत: नागराज मंजुळे यांनी त्यांच्या डान्सचा एक खास व्हिडिओ आपल्या फेसबूकवर अकांउटवर अपलोड केला आहे. 'दस्तूरखुद्द सैराटांचं झिंगाट...' या नावाने हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. अवघ्या तासाभरापूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ शेकडो जणांनी शेअर केला आहे.
सध्या सैराट सिनेमातील गाणी चांगलीच गाजत आहेत. त्यात झिंगाटने तर कमालच केली आहे. अनेक कार्यक्रमात हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. नागराज यांचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
पाहा अजय-अतुल आणि नागराज मंजुळेचा तुफानी डान्स:
दस्तुरखुद्द सैराटांचं झिंगाट … Posted by Nagraj Manjule on Sunday, April 10, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
करमणूक
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement