एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चित्रपट क्षेत्रात जगभरातल्या सर्वांना जागा दिली पाहिजे: सैफ अली खान
मुंबई: 'चित्रपट क्षेत्रात जगभरातल्या सर्वांना जागा दिली पाहिजे, मात्र सरकारनं आता यावर निर्णय घ्यावा.' अशी सावध भूमिका सैफ अली खाननं घेतली आहे. मनसेच्या अल्टिमेटमनंतर पाकिस्तानच्या कलाकारांना भारत सोडावा लागला आहे. त्यावर सैफ अली खाननं ही प्रतिक्रिया दिली आहे.
प्रेम आणि शांततेविषयी बोलत असलो तरी कुणाला देशात येऊ द्यावं अथवा नाही याचा अंतिम निर्णय हा सरकारलाच घ्यायचा आहे. हे सांगायला सैफ अली खान विसरला नाही.
दरम्यान, पाकिस्तानी कलाकार फवाद खान, महिरा खान आणि अली जफर यांनी भारत सोडला आहे. मनसेच्या अल्टिमेटवर त्यांनी आपले गुडघे टेकवले.
उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेनं त्यांना 48 तासांचा अल्टीमेटम दिला होता. फवाद, महिरा, अनुष्का, ऐश्वर्या, रनवीर यांचा ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा 28 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. परंतु उरी हल्ल्यानंतर भारत देश सोडावा अशी धमकी मनसेन दिली होती. त्यानंतर या कलाकारांनी भारत सोडला. कालाकारांनी भारत सोडल्यानंतर पाकिस्तानी मीडियानं भारतावर टीका केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement