'टीव्हीवर पाहिलं, मग समजलं हिरोवर हल्ला केला', सैफ अली खानवर चाकूचे वार करणाऱ्या माथेफीरुची धक्कादायक माहिती समोर!
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शहजाद याच्याबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात प्राणघातक हल्ला झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शहजाद याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आता या हल्ला प्रकरणात नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शहजाद याला आपण नेमका कोणावर हल्ला केलाय, याची कल्पनाच नव्हती.
टीव्हीवर पाहिलं नंतर समजलं की...
या प्रकरणातील आरोपी शहजाद याला त्याने नेमका कोणावर हल्ला केला आहे, याची कल्पनाच नव्हती. टीव्हीवरील बातम्या तसेच सोशल मीडियावर पाहिल्यानंतर मी एका अभिनेत्यावर हल्ला केल्याचे त्याला समजले, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या आरोपीकडे असलेल्या सामानमुळे त्याचा गुन्हेगारी इतिहास असावा, अशी शंका पोलिसांना आहे.
सैफ अली खानवर हल्ला करून बसस्टॉपवर झोपला
मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी त्याने सैफ अली खानच्या घरात जाऊन हल्ला केला, त्या दिवशी तो सकाळी सात वाजता वांद्रा या परिसरात होता. येथे तो एका बस स्टॉपवर झोपला होता. तो मूळचा बांगलादेशचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तो अवैध पद्धतीने भारतात घुसला होता. भारतात तो नाव बदलून राहात होता. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर त्याला पोलिसांनी ठाणे येथून बेड्या ठोकल्या. तो 16 जानेवारी रोजी चोरी करण्याच्या उद्देशाने सतगुरू शरण इमारतीत सैफ अली खानच्या घरात घुसला होता. त्यानंतर 17 जानेवारी रोजी तो वांद्रा पश्चिम या भागात पटवर्धन गार्डनर आहे. या भागातील बस स्थानकावर तो झोपला होता.
सैफच्या घरात नेमकं कसा घुसला?
मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या घरापुढे मोठ्या प्रमाणात सुरक्षा होती. मात्र तो सातव्या आणि आठव्या मजल्यापर्यंत पायऱ्यांनी गेला. त्यानंतर इमारतीच्या डक्ट भागात जाऊन त्याने एका पाईपच्या मदतीने 12 वा मजला गाठला. त्यानंतर बाथरुमच्या खिडकीतून त्याने सैफ अली खानच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर त्याला सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलं. त्यानंतर त्याने सैफ अली खानने त्याच्यावर हल्ला केला.
हेही वाचा :
'आशिकी'तल्या राहुलने तरुणाईला प्रेम शिकवलं, पण नंतर बॉलिवुडमधून गायब; 'हा' अभिनेता नेमका कुठे गेला?