'आशिकी'तल्या राहुलने तरुणाईला प्रेम शिकवलं, पण नंतर बॉलिवुडमधून गायब; 'हा' अभिनेता नेमका कुठे गेला?
आशिकी चित्रपटातील अभिनेत्याला पाहण्यासाठी कधीकाळी तरुणी अक्षरश: गर्दी करायच्या. आता मात्र हा अभिनेता गायब झाला आहे. त्यामुळे हा अभिनेता नेमकं काय करतोय? असे विचारले जात आहे.
मुंबई : बॉलिवुड हे असं क्षेत्र आहे, ज्यात कधी एखादा कलाकार एका रात्रीत स्टार होतो, तर कधी एखादी व्यक्ती शून्य होऊन जाते. येथे रोज अनेक तरुण-तरुण अभिनयात नाव कमवण्यासाठी जीवाचं रान करतात. मात्र प्रत्येकालाच येथे सूर गवसत नाही. बॉलिवुडमध्ये आल्यानंतर काही लोक लगेच नाहीसे होतात. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे आशिकी या गाजलेल्या चित्रपटाचा हिरो. हा अभिनेता आशिकी चित्रपटाच्या माध्यमातून त्या काळी घराघरात पोहोचला होता. आता मात्र तो कोणत्याही चित्रपटात दिसत नाही. त्यामुळेच अनेक तरुण-तरुणींना प्रेम करायला शिकवणारा हा अभिनेता आता कुठे आहे? असे विचारले जातेय.
आशिकी चित्रपटामुळे देशभरात प्रसिद्धी
नव्वदच्या दशकात आलेला आशिकी हा चित्रपट तेव्हा चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील गाणी तर तरुणाईला तोंडपाठ होती. आजही या चित्रपटातील गीतं तेवढ्याच आवडीने ऐकली जातात. या चित्रपटाची कथाही तेव्हा अनेकांना भावली होती. म्हणूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. सोबतच या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणाऱ्या राहुल रॉयलाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. तो या चित्रपटामुळे संपूर्ण भारताला माहिती झाला होता. आता मात्र तो लाईमलाईटमध्ये दिसत नाही.
नंतर मात्र झाला गायब
राहुल राय हा अभिनेता 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एख होता. आशिकी हा चित्रपट 1990 साली आला होता. या चित्रपटाने त्याला नवी ओळख मिळवून दिली. याच चित्रपटापासून त्याने बॉलिवुडमध्ये सुरुवात केली होती. या चित्रपटात राहुल रॉयसोबत अनु अग्रवाल आणि दीपक तिजोरी यांनीदेखील स्क्रीन शेअर केली होती. लोकांना हा चित्रपट चांगलाच आवडला होता. नंतर मात्र हा अभिनेता बॉलिवुडमध्ये फार काही उल्लेखनीय कामगिरी करू शकला नाही. आशिकी या चित्रपटानंतर राहुल रॉयचे इतरही अनेक चित्रपट आले. मात्र हे चित्रपट सिनेरसिकांना फार काही आवडले नाही. कालांतराने तो अभिनय क्षेत्रातून नाहीसा झाला.
View this post on Instagram
राहुल रॉय सध्या काय करतोय?
राहुल रॉय आज अभिनय या क्षेत्रात कार्यरत नसला तरी तो आजही बॉलिवुडमध्ये सक्रीय आहे. त्याचे स्वत:चे एक प्रोडक्शन हाऊस आहे. या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती करतो. राहुल रॉय आज एक उद्योजक म्हणून नावारुपाला आलेला आहे. हा अभिनेता सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रीय असतो. त्याच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगत असतो. कधीकाळी राहुल रॉयवर तरुणी फिदा असायचा. आता मात्र त्याचे आयुष्य फार बदलले आहे.
हेही वाचा :