Bigg Boss 18 Grand Finale Live Updates : बिग बॉसचा आज ग्रँड फिनाले, किती वाजता सुरू होणार, कुठे लाईव्ह पाहता येणार?
Bigg Boss 18 Grand Finale Live Updates : बिग बॉस हिंदीच्या 18 व्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Bigg Boss 18 Grand Finale: गेल्या काही दिवसांपासून देशभरात बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सिझनची सगळीकडे चर्चा होती. या सिझनमध्ये कोण विजेता ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता या सिझनचा विजेता ठरवण्याची वेळ आली आहे. बिग बॉसच्या 18 व्या सिझनचा ग्रँड फिनाल आज म्हणजे 19 जानेवारी रोजी होणार असून आजच विजेताही ठरणार आहे. त्यामुळे हा ग्रँड फिनाले शो नेमका कुठे पाहायला मिळणार? तसेच अंतिम फेरीत धडक मारणारे स्पर्धक कोण आहेत? हे जाणून घेऊ या..
बिग बॉस हा रिअॅलिटी शो अभिनेता सलमान खानकडून होस्ट केला जातो. गेल्या वर्षातल्या 6 ऑक्टोबरपासून बिग बॉसचा 18 वा सिझन चालू आहे. याच सिझनचा ग्रँड फिनाले आता 19 तारखेला रात्री चालू होणार आहे. आजच्या भागात बिग बॉसचा विजेता ठरवला जाणार आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी प्रत्येक वेळी बिग बॉसकडून खास असा ट्विस्ट आणला जातो. यावेळी हा ट्विस्ट कोणता असेल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बिग बॉसचा ग्रँड फिनाले कुठे पाहता येणार?
बिग बॉसचा ग्रँड फिनाले 19 जानेवारी रोजी म्हणजेच रविवारी होणार आहे. या फिनालेचे लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला जिओ सिनेमा या ओटीटी अॅपवर पाहता येईल. त्यासाठी तुमच्याकडे जिओ सिनेमाचे प्रिमियम सबस्क्रीप्शन असणे गरजेचे आहे. ते नसेल तर तुम्हाला हा ग्रँड फिनाले लाईव्ह पाहता येणार नाही.
यावेळी एकूण सहा स्पर्धक अंतिम फेरीत
प्रत्येक वेळी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये एकूण पाच स्पर्धक असतात. या पाच स्पर्धकांपेकीच एकाची विजेता म्हणून निवड होते. यावेळी मात्र बिग बॉसने एकूण सहा जणाचा ग्रँड फिनालेमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे यावेळी सहा स्पर्धकांपैकी एका बिग बॉसचा विजेता म्हणून ट्रॉफी मिळणार आहे.
बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेत किती स्पर्धक (Bigg Boss 18 Grand Finale Contestants)
विवियन डीसेना (Vivian Dsena)
रजत दलाल (Rajat Dalal)
अविनाश मिश्रा (Avinash Mishra)
चुम दरांग (Chum Darang)
ईशा सिंह (Eisha Singh)
करणवीर मेहरा (Karanveer Mehra)
विजेत्याला किती रक्कम मिळणार?
याआधीच्या सिझनप्रमाणेच यावेळीदेखील बिग बॉसचा 18 वा सिझन एकदम खास असणार आहे. कारण या फिनालेत अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे आधीच्या सिझनप्रमाणे या सिझनमध्येही विजेत्याला बिग बॉसची ट्रॉफी तसेच 50 लाख रुपये मिळणार आहेत.
हेही वाचा :