Rudra Trailer : प्रतीक्षा संपली, Ajay Devgn ची पहिली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर प्रदर्शित
Rudra: The edge of darkness : अजय देवगणच्या आगामी 'रुद्र' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Rudra Ajay Devgn Trailer Out : अजय देवगण (Ajay Devgn) ची आगामी वेबसीरिज रूद्र (Rudra: The edge of darkness) चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये अॅक्शनचा तडका असणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून अजय ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. तसेच या वेबसीरिजमध्ये अजय मुख्य भूमिकेत आहे.
'रूद्र' या सीरिजमध्ये अजय देवगणने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्नाचा (Rashi Khanna) अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. ही सीरिज गुन्हेगारीवर भाष्य करणारी आहे. ही वेब सीरिज 4 मार्चला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
'रूद्र' ही वेबसीरिज 6 भागांची असून रुद्रवीर सिंह हे पात्र अजय देवगण साकारत आहे. ईशा देओल, राशी खन्ना, अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर, मिलिंद गुणाजी आणि ल्यूक केनीदेखील या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंटने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.
संबंधित बातम्या
Glimpse of Radhe Shyam : प्रभासचं प्रेक्षकांना ‘व्हॅलेंटाईन डे’ सरप्राईज, ‘राधे श्याम’चे नवे पोस्टर रिलीज
One Four Three : 'करेन तर मामाचीच', 'वन फोर थ्री' चित्रपटाचा रोमँटिक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!
Doctor Strange Trailer : ‘डॉक्टर स्ट्रेंज’मध्ये ‘आयर्न मॅन’ परतला! आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha