One Four Three : 'करेन तर मामाचीच', 'वन फोर थ्री' चित्रपटाचा रोमँटिक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!
'हे आपलं काळीज हाय', 'करेन तर मामाचीच' या टॅगलाईन सध्या सोशल मीडियावर गाजल्या आहेत. नेमक्या या टॅगलाईन काय आहेत, हे नुकतेच चित्रपटाच्या ट्रेलरमधून उघडकीस आले आहे.
One Four Three Marathi Movie : दिग्दर्शक योगेश भोसले 'वन फोर थ्री' (One Four Three) हा आपला मराठी चित्रपट येत्या 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस आणत असून, तत्पूर्वी या चित्रपटाची एक खास झलक म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करून, त्यांनी रसिक प्रेक्षकांना आणि प्रेमीयुगुलांना 'व्हॅलेंटाईन डे' ची भेट दिली आहे. 'व्हॅलेंटाईन डे' चे औचित्य साधत या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी आला आहे. प्रत्येक प्रेमी युवक युवती या ट्रेलरला त्यांच्या व्हॅलेंटाईनला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी डेडिकेट करू शकेल असा हा ट्रेलर आहे.
'हे आपलं काळीज हाय', 'करेन तर मामाचीच' या टॅगलाईन सध्या सोशल मीडियावर गाजल्या आहेत. नेमक्या या टॅगलाईन काय आहेत, हे नुकतेच चित्रपटाच्या ट्रेलरमधून उघडकीस आले आहे. 'वन फोर थ्री' चित्रपटाची चर्चा सध्या मनोरंजनविश्वात रंगलेली तर आहेच, त्यात या उत्कंठावर्धक आणि लव्हेबल ट्रेलरने दणक्यात केलेल्या एन्ट्रीने रसिकांची उत्सुकता अधिकच ताणून धरली जाणार आहे.
पाहा ट्रेलर :
'वन फोर थ्री' चित्रपट हा दाक्षिणात्य धाटणीचा असून रिअल लाईफ स्टोरीवर आधारित आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत प्रेमीयुगुलांसाठी पर्वणीच ठरला आहे. या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांची रोमँटिक जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत असून खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला.
पहिल्या नजरेतला पहिल्या वाहिल्या प्रेमाने व्याकुळलेली चित्रपटातील जोडगोळी प्रेमाची ग्वाही देताना दिसणार आहे. दाक्षिणात्य धाटणीच्या या चित्रपटात साऊथ स्टाईलने ही जोडी आपले प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे. मधू आणि विशूची प्रेमकहाणी तर अनंताचा जबरा खलनायकी रूप प्रेक्षकांना नक्कीच खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंकाच नाही.
चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर विशू आणि मधुची लव्हस्टोरी पूर्ण होईल का? एकमेकांसाठी बनलेल्या विशू आणि मधूला त्यांचे प्रेम एकत्र ठेवेल का? मधू आणि विशूच्या प्रेमात अनंता अडथळा आणेल का? असे अनेक प्रश्न पडले असतील. मात्र, या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळतील. हा चित्रपट 4 मार्चला रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
- Gangubai Kathiawadi : रणवीर सिंगकडून आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं जोरदार प्रमोशन, ‘ढोलिडा’वर धरला ठेका!
- Prajaktta Mali : ‘लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे!’, प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
- Kangana Ranaut : ‘असा कचरा विकू नका’, कंगना रनौतची दीपिकाच्या ‘Gehraiyaan’वर सडकून टीका!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha