एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
REVIEW | मिशन मंगल - मंगल हो
बाहुबलीसारख्या चित्रपटांनी आपण काहीही करु शकतो हे दाखवून दिलं आहेच. पण त्याही पलिकडे अंंतराळात झेपावण्याऱ्या गोष्टी मुठीत पकडून सिनेरसिकांना दाखवण्याची किमया आजवर कुणी केली नव्हती. ती 'मिशन मंगल'ने करुन दाखवली आहे.
आपल्याकडे हरतऱ्हेचे सिनेमे बनतात. नवनव्या गोष्टी त्यासाठी लिहिल्या जातात. आपल्याकडच्या अभिनेत्यांना नवनव्या संधी मिळतात भूमिका करण्याच्या. पण जिथे व्हीएफएक्सचा प्रश्न येतो तिथे आपण फार रिस्क घेत नाही. कारण त्यासाठी लागणारा खर्च.. त्यासाठी लागणारं निष्णात मनुष्यबळ आपल्याला हवं तेव्हा मिळेलच असं नाही. पण त्यावरही आता कडी केली आहे ती 'मिशन मंगल' या सिनेमाने. म्हणजे, बाहुबलीसारख्या चित्रपटांनी आपण काहीही करु शकतो हे दाखवून दिलं आहेच. पण त्याही पलिकडे अंंतराळात झेपावण्याऱ्या गोष्टी मुठीत पकडून सिनेरसिकांना दाखवण्याची किमया आजवर कुणी केली नव्हती. ती 'मिशन मंगल'ने करुन दाखवली आहे. म्हणून हा सिनेमा महत्वाचा. या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, दिलीप ताहिल, विक्रम गोखले यांच्या भूमिका आहेत म्हणून आपलं या सिनेमाकडे लक्ष असणार हे साहजिक आहे. पण त्या पलिकडे इस्रोमध्ये नेमकं कसं काम चालतं, तिथे कशाप्रकारे ताण असतात ते दाखवण्याचं दिव्य या सिनेमाने पार पाडलं आहे. म्हणून हा सिनेमा महत्त्वाचा.
इस्रोला यंदा ५० वर्षं पूर्ण होत आहेत. याच मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होतो आहे. जगन शक्ती दिग्दर्शित हा चित्रपट सक्सेस स्टोरी आहे. त्यामुळे याचा शेवट गोड आहे हे ओघाने आलंच. पण त्यापलिकडे, जेव्हा एखाद्या गोष्टीचं बजेट जगात 500 कोटी असतं, भारतासाठी त्यात 100 रुपयांची तरतूद असताना आपण जेव्हा ती केवळ 50 रुपयांत यशस्वी करुन दाखवतो तेव्हा त्याचं महत्त्व वाढतं. 'मिशन मंगल' करण्यासाठी तिथे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी कशी कंबर कसली.. त्यात कोणती आव्हानं आली.. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी.. त्यांची व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातला वावर दाखवण्याचाही प्रयत्न झाला आहे. शिवाय इस्रोमध्ये नेमकं कसं काम चालतं.. हेही दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.
हा सिनेमा पाहताना मनात स्वाभिमान भरुन उरतो हे खरं. पण यातली गाणी..त्यात नाचणारे शास्त्रज्ञ हे जरा झेपत नाही. शिवाय हा सिनेमा पाहताना तो आणखी भिडायला हवा होता असं वाटून जातं. पण एकूणात हा सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत तीन स्टार्स.
सर्वांनी पाहावा असा हा चित्रपट आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement