एक्स्प्लोर
Advertisement
आक्षेपार्ह दृष्य वगळून 'जॉली एलएलबी 2' प्रदर्शित होणार
औरंगाबाद : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी 2 सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात या सिनेमाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने निर्मात्यांना दिलासा दिला आहे.
न्याय व्यवस्थेच्या प्रतिमेवर परीणाम होईल, असे सीन सिनेमातून हटवले जातील, असं स्पष्टीकरण निर्मात्यांची वकिलांनी कोर्टात दिलं. वकिलांच्या स्पष्टीकरणानंतर हायकोर्टाने सिनेमाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली.
अॅड. अजयकुमार वाघमारे, अॅड. पंडितराव आनेराव यांनी ‘जॉली एलएलबी 2’ विरोधात याचिका दाखल केली होती. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वकील न्यायालयात पत्ते खेळतात, न्यायमूर्तींच्या डायसवर धावून जातात, न्यायमूर्तींसमोर हाणामारी आणि बीभत्स नृत्यही करतात, असं दाखवण्यात आलं आहे. चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असं लिहून निर्माता आणि दिग्दर्शकांनी न्यायव्यवस्थेची आणि वकिली व्यवसायाची थट्टा केली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव, केंद्रीय विधी आणि न्याय सचिव, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, फॉक्स स्टार इंडिया स्टुडिओ, चित्रपटाचे निर्माता, लेखक सुभाष कपूर, अक्षयकुमार, अन्नू कपूर, राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे सचिव, विधी आणि न्याय विभाग यांना प्रतिवादी करण्यात आलं होतं.
चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्य आणि एलएलबी हा शब्द वगळावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. हा सिनेमा 10 फेब्रुवारी रोजी भारतासह दहा देशात रिलीज होणार आहे.
ट्रेलर :
संबंधित बातम्या :
अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 2' विरोधात हायकोर्टात याचिका
अक्षयकुमारच्या ‘जॉली एलएलबी 2’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
भ्रष्टांपुढे जॉली झुकणार नाही, ‘जॉली एलएलबी 2’चा दुसरा ट्रेलर
‘जॉली एलएलबी-2’ चा मेकिंग व्हिडिओ रिलीज
‘बावरा मन..’ अक्षयच्या ‘जॉली एलएलबी 2’ मधलं रोमँटिक गाणं
‘जॉली एलएलबी 2’ चा फर्स्ट लूक रिलीज
‘जॉली एलएलबी 2’ साठी अक्षय दिवसाला घेणार 1 कोटी रुपये!
अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 2’चं पोस्टर रिलीज, शूटिंगही सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement