एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेखा यांचं ऐश्वर्या राय बच्चनला भावुक पत्र!
ऐश्वर्याचं कौतुक करण्याची रेखा यांची ही पहिलीच वेळ नाही. एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या आणि रेखा यांच्यातील खास नात दिसलं होतं.
मुंबई : बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी काही दिवसांपूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला भावुक पत्र लिहिलं होतं. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दोन दशकं पूर्ण केल्याच्या निमित्ताने रेखा यांनी ऐश्वर्याला पत्र लिहिलं.
या पत्रात रेखा यांनी ऐश्वर्याचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. पण हे पत्र मॅग्झिनमध्ये छापून आल्यानंतर अखेर रेखा यांनी पत्र नेमकं का लिहिलं अशी चर्चा रंगू लागली.
रेखा, बच्चन कुटुंबाच्या फार जवळ नाहीत. सार्वजनिक ठिकाणी अमिताभ बच्चन रेखा यांना कायम टाळताना दिसतात. रेखा समोर आल्यावर औपचारिकता म्हणून जया आणि अभिषेक त्यांना नमस्कार करतात. तर ऐश्वर्या राय बच्चन रेखा यांना खुल्या मंचावर ‘मां’ म्हणून हाक मारते.
काही वृत्तानुसार, बच्चन कुटुंबाच्या जवळ येण्याची रेखा यांची इच्छा आहे. बच्चन कुटुंबापैकी ऐश्वर्या एकमेव व्यक्ती जिचे रेखा यांच्याशी चांगले संबंध आहेत.
ऐश्वर्याचं कौतुक करण्याची रेखा यांची ही पहिलीच वेळ नाही. एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या आणि रेखा यांच्यातील खास नात दिसलं होतं.
‘माझी अश’ असं लिहून रेखा यांनी पत्राची सुरुवात केली आणि स्वत:चा ‘रेखा मां’ असा उल्लेख करत शेवट केला होता. पत्रात त्यांनी ऐश्वर्याने साकारलेल्या अनेक भूमिकांवर मत मांडलं. “तू प्रत्येक भूमिकांना न्याय दिलास. मग तो खऱ्या आयुष्याशी संबंधित असो वा फिल्मी. तू परिपूर्ण आहेस. कोणालाही सिद्ध करुन दाखवण्याची तुला गरज नाही,” असं रेखा यांनी पत्रात लिहिलं आहे.
पुढे रेखा लिहितात की, “पण आराध्याच्या आईची तुझी भूमिका, मला सर्वाधिक आनंद देते. तुला खूप आनंद मिळो, अशी प्रार्थना करते. खूप प्रेम, आयुष्यमान हो... रेखा मां.”
ऐश्वर्या राय रेखा यांना ‘मां’ बोलते. ‘जब्जा’ सिनेमासाठी रेखा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्या म्हणाली होती की, “मां कडून हा पुरस्कार स्वीकारणं हे सन्मानाची गोष्ट आहे.” त्यावर रेखा यांनी उत्तर दिलं की, “यापुढेही अनेक वर्ष तुला पुरस्कार देऊ शकेन, अशी आशा आहे.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement