Raveena Tandon: वयाच्या 46 व्या वर्षी रवीना झाली 'आजी'; कॉलेज सोडून अभिनय क्षेत्रात केलं काम
रवीनानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आज तिचा 48 वा वाढदिवस आहे.
Raveena Tandon: 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमधील एक अभिनेत्री असणाऱ्या रवीना टंडनचा (Raveena Tandon) चाहता वर्ग मोठा आहे. रवीनानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आज तिचा 48 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं जाणून घेऊयात तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...
रवीनाचे बालपण मुंबईत गेले. तिच्या वडिलांचे नाव रवी टंडन आणि आईचे नाव वीणा आहे. रवीनाचे टोपणनाव मुनमुन आहे. रवीनानं जमुनाबाई पब्लिक स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिनं मिठीबाई कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. कॉलेजच्या दिवसांपासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये असतानाच तिला मॉडेलिंगसाठी ऑफर्स मिळू लागल्या, त्यानंतर तिने पदवीच्या दुसऱ्या वर्षातच शिक्षण सोडले.
17 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण
रवीनाने 1991 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट सलमान खानसोबत होता. या चित्रपटाचे नाव होते 'पत्थर के फूल'. या चित्रपटातील रवीनाच्या अभिनयाचे आणि तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक झाले होते. तिला त्या वर्षातील फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही. 'अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात.
वयाच्या 46 व्या वर्षी झाली अजी
रवीनाने लग्नापूर्वी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं. तेव्हा रवीनाचं वय 21 वर्षे होते. छाया आणि पूजा या दोन्ही मुलींचे लग्न झाले असून त्यांना मुलेही आहेत. त्यामुळे रवीना ही वयाच्या 46 व्या वर्षी आजी झाली. 2004 मध्ये रवीनाने अनिल थडानीसोबत लग्न केले. त्यांना रणबीर आणि राशा नावाची दोन मुले देखील आहेत.
View this post on Instagram
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Raveena Tandon : 'लोकल आणि बसमध्ये शारीरिक छळ, छेडछाड....'; अभिनेत्री रवीना टंडननं सांगितला अनुभव