Raveena Tandon : 'लोकल आणि बसमध्ये शारीरिक छळ, छेडछाड....'; अभिनेत्री रविना टंडननं सांगितला अनुभव
अभिनेत्री रवीना टंडननं (Raveena Tandon) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Raveena Tandon : मुंबईतल्या 'आरे मेट्रो 3 कारशेड' (Aarey Metro 3 Car Shed) मुद्द्यामुळे महाराष्ट्रातील पर्यावरणवादी पुन्हा एकवटणार आहेत. पर्यवरणप्रेमींनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. 2019 साली एका रात्रीत 'आरे'मध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी 2700 झाडांची कत्तल करण्यात आली होती. आता आरे कॉलनीसाठी पर्यावरणप्रेमी पुन्हा एकवटले आहेत. याचं मुद्द्यावर सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे.
अभिनेत्री रवीना टंडन ही पर्यावरणप्रेमी आहे. मेट्रोकार शेडमुळे जंगलांचे नुकसान होऊ नये, असं रवीनाचं मत आहे. रवीना ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. रवीनाच्या एका चाहत्यानं एक ट्वीट शेअर करुन तिला मुंबईमधील मिडल क्लास लोकांच्या स्ट्रगलबाबत विचारलं. त्यावर उत्तर देत रवीनानं तिचा टीनेजमध्ये असतानाचा अनुभव सांगितला. रवीनानं शेअर केल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी जेव्हा टीनेजर होते, तेव्हा मी लोकल ट्रेन आणि बसमध्ये प्रवास केला. त्यावेळी अनेक वेळा छेडछाड, चिमटा काढणे हे प्रकार माझ्यासोबत झाले. लोकल आणि बसमध्ये प्रवास करताना जे अनुभव महिलांना येतात ते मला देखील आले. मी 1992 मध्ये पहिली कार घेतली. विकासाचे स्वागत करावे. पर्यावरण/वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी केवळ एका प्रकल्पाबद्दलच नाही, तर आपण जिथे जंगलतोड करत आहोत त्याचा देखील विचार केला पाहिजे.'
Teen yrs,travelled in locals/buses,got eveteased,pinched,everything that most women go through,earned my first car in 92.Development is welcome,we have to b responsible,not only a project,but wherever we are cutting thru r forests,to safeguard environment/wildlife. @SunainaHoley https://t.co/Wwxk5IDzJU
— Raveena Tandon (@TandonRaveena) July 2, 2022
ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर
एका युझरनं ट्वीट शेअर करत रवीनाला प्रश्न विचारला की, 'तू मेट्रोच्या विरोधात बोलत आहे तर आम्हाला सांग की, तू लोकल ट्रेनमध्ये कधी प्रवास केला आहेस?'. युझरच्या प्रश्नाला रवीनानं उत्तर दिलं, '1991 पर्यंत मी लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला. मी मुलगी आहे, त्यामुळे प्रवास करताना तुमच्या सारख्या नाव नसलेल्या ट्रोलर्सनं माझा शारीरिक छळ केला आहे. मला कामात यश मिळालं म्हणून मी कार खरेदी केली. तुम्ही नागपूरचे आहात ना? तुमच्या शहरात हिरवळ आहे. त्यामुळे कोणाच्याही यशाबाबत तसेच कमाईबाबत विचार करु नका.'
हेही वाचा: