(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Actress: सेक्रेड गेम्समधील नवाजुद्दीनसोबतच्या 'त्या' सीनमुळे 'पॉर्न अॅक्टर'चा टॅग लागला; मराठमोळ्या अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत
सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सीरिजमधील सुभद्रा ही भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) हिने साकारली आहे. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील इंटिमेट सीन्सबद्दल राजश्रीनं सांगितलं.
Rajshri Deshpande: नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजमधील इंटिमेट सीन्स आणि कलाकारांच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीनं (Nawazuddin Siddiqui) गणेश गायतोंडे ही भूमिका साकारली. गणेश गायतोंडेची पत्नी सुभद्रा ही भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) हिने साकारली आहे. सुभद्रा आणि गणेश गायतोंडेचे काही इंटिमेट सीन्स सीरिजमध्ये आहेत. या सीन्सबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजश्री देशपांडेनं सांगितलं.
राजश्री म्हणाली, मला “पोर्न अॅक्टर” चा टॅग देण्यात आला
सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील नवाजुद्दीनसोबतचा इंटिमेट सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मला “पोर्न अॅक्टर” चा टॅग देण्यात आला होता, असं राजश्री देशपांडेनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
एका मुलाखतीमध्ये राजश्रीने शेअर केले की, सेक्रेड गेम्समधील तिचा इंटिमेट सीन केवळ व्हायरल झाला नाही तर तो मॉर्फ करण्यात आला आणि त्याचा गैरवापरही झाला. “सेक्रेड गेम्समधील सीन व्हायरल झाला आणि तो मॉर्फ झाला, तो सर्वत्र वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आला. माझ्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट्स लिहिल्या गेल्या,”, असं राजश्री म्हणाली.
"नवाज सुद्धा त्या सीरिजचा भाग होता, त्याला कोणी प्रश्न विचारला नाही, कोणी अनुराग कश्यपलाला देखील प्रश्न विचारले नाही की, तू हा सीन का केलास? असा प्रश्न फक्त मलाच विचारला गेला. अनेकांनी मला 'पॉर्न अॅक्टर' असा टॅग दिला, आज माझी संपूर्ण ओळख फक्त सेक्रेड गेम्सची अभिनेत्री म्हणूनच आहे. ट्रायल बाय फायर या माझ्या वेब सीरिजमुळे देखील मला सेक्रेड गेम्स एवढी प्रसिद्धी मिळाली नाही.", असंही राजश्रीनं सांगितलं.
View this post on Instagram
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजश्रीने सांगितलं की, ती इंटिमेट दृश्यांच्या चित्रीकरणादरम्यान अजिबात अस्वस्थ नव्हती. ती सीन शूट करताना कम्फर्टेबल आहे की नाही याची नवाजुद्दीनने खात्री केली आहे. ती म्हणाली, “मला आनंद आहे की, मला सुभद्रा ही भूमिका करायला मिळाली कारण ती गायतोंडेच्या आयुष्यातील एक महत्त्वाची भूमिका आहे.”
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: