RRR Box Office Collection : राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाचा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
RRR : आरआरआर सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 240 कोटींची कमाई केली आहे.
RRR Box Office Collection Day 2 : एस. एस राजामौली (SS Rajamouli) यांचा 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशीदेखील चांगली कमाई केली आहे. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 240 कोटींची कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'आरआरआर' सिनेमाने दुसऱ्या दिवशी 23.75 कोटींची कमाई केली आहे. 'आरआरआर' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'आरआरआर' सिनेमाला मुंबई, गुजरात, यूपी, बिहार, ओडिशा आणि दिल्ली या भागांत प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
View this post on Instagram
एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' सिनेमात आलिया भट्ट, अजय देवगन, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. 'आरआरआर' हा सिनेमा तयार करण्यासाठी 400 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे हा बिग बजेट सिनेमा आहे.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
KGF 2 Trailer Launch : सुपरस्टार यशच्या 'KGF 2' सिनेमाचा ट्रेलर आऊट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha






















