Radhika Merchant : अंबानींची होणारी सून भरतनाट्यम नृत्यांगना! राधिका मर्चेंटचं नेमकं शिक्षण किती?
Radhika Merchant : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यामुळे आता अंबानींची होणारी सून राधिका मर्चेंटबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Radhika Merchant : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चेंट (Radhika Merchant) येत्या जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम पार पडला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम पार पडला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या भव्यदिव्य सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसह, जगभरातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. प्री-वेडिंग कार्यक्रमानंतर अंबानींची होणारी सून राधिका मर्चेंटबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अंबानींची होणारी सून भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तर मोठी सून श्लोका मेहता (Shloka Mehta) वकील आहे.
राधिका मर्चेंटचं नेमकं शिक्षण किती? (Radhika Merchant Educational Qualification)
राधिका मर्चेंट एक उद्योगपती आहे. एनकॉर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चेंट आणि शायला मर्चेंट यांची ती एकुलती एक मुलगी आहे. तसेच ती एका कंपनीची डायरेक्टर आहे. मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेतून तिने शालेय शिक्षण घेतलं आहे. पुढे न्यूयॉर्क विद्यापिठातून तिने राजकारण आणि अर्थशास्त्र विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. सासू नीता अंबानीप्रमाणे (Nita Ambani) राधिका मर्चेंटदेखील भरतनाट्यम नृत्यांगना आहे.
अंबानींची थोरली सून वकील
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता आहे. श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचा लग्नसोहळा 2019 मध्ये पार पडला होता. श्लोका हिऱ्याचे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. श्लोकाने न्यू जर्सी प्रिसटन विद्यापिठातून मानव विज्ञान विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल या महाविद्यालयातून तिने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे.
अंबानींचा जावई कोण?
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या जावयाचं नाव आनंद परिमल आहे. ईशा अंबानी आणि आनंद परिमल 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. आनंद यांनी श्वोकाप्रमाणे न्यू जर्सी प्रिंसटन महाविद्यालयातून मानव विज्ञान विषयात पदवी मिळवली आहे. तसेच लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायंसमधून तिने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर हार्वड बिजनेस स्कूलमध्ये त्याने MDA केलं.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना तीन मुलं आहेत. आकाश आणि ईशा हे जुळे आहेत. आकाश अंबानीकडे USA मधील ब्राऊन विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयातली पदवी आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधूल त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. ईशा अंबानीने येल विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. अनंत अंबानी यांनीदेखील ब्राऊन विद्यापाठीतून शिक्षण घेतलं आहे.
संबंधित बातम्या