एक्स्प्लोर
प्रियांका-निकच्या शाही लग्नस्थळाचं एका दिवसाचं भाडं...
देसी गर्ल प्रियांका आणि निकने आपल्या लग्नासाठी खास स्थळाची निवड केली आहे. हे दोघे 2 डिसेंबरला जोधपूरच्या आलिशान उमेद भवन पॅलेसमध्ये शाही थाटात लग्न करणार आहेत. त्यासाठी निक गुरुवारीच भारतात पोहोचला.

जयपूर : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तयारी मोठ्या थाटात सुरु आहे. त्यासोबतच देसी गर्ल प्रियांका आणि निकने आपल्या लग्नासाठी खास स्थळाची निवड केली आहे. हे दोघे 2 डिसेंबरला जोधपूरच्या आलिशान उमेद भवन पॅलेसमध्ये शाही थाटात लग्न करणार आहेत. त्यासाठी निक गुरुवारीच भारतात पोहोचला.
प्रियांका-निक यांच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट खास असणार आहे. तशी तयारी आत्तापासूनच सुरु केली असून ह्या लग्नाचं बजेट ही खूप असणार आहे. याचा अंदाज उमेद भवन पॅलेसच्या एका रात्रीच्या भाड्यावरुन लावता येईल. कारण उमेद भवन पॅलेसचे एका रात्रीचं भाडं 43 लाख 15हजार 500 रुपये इतकं असल्याची माहिती मिळत आहे.
उमेद भवन पॅलेस हा पूर्वी राजमहाल होता, जिथे आज मोठं हॉटेल उभारण्यात आलं आहे. तेथील वैभवशाली आणि आकर्षक सजावट डोळे दिपवणारी आहे. सर्व आधुनिक सुविधा असलेल्या या पॅलेसची पाहणी करण्यासाठी प्रियांकाची आई मधू चोप्रा ह्या राजस्थानला गेल्या होत्या.
या पॅलेसमध्ये विविध प्रकारच्या आलिशान सुइट आहेत. ज्यात सर्वात खास महाराणी सुट आहे. त्याच महाराणी सुटमध्ये प्रियांका-निक लग्नादिवशी थांबणार असल्याची माहिती मिळत आहे. या दोघांनी मित्र, नातेवाईकांसाठी 65 रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. ज्यासाठी रुमच भाडं एका रात्रीसाठी तब्बल 66 हजार रुपये इतके आहे.



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
