एक्स्प्लोर
प्रिती झिंटाच्या भावाची आत्महत्या, पत्नीसह सासू-सासरे अटकेत
शिमला : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या भावाने आत्महत्या केली आहे. शिमलामध्ये नितीन चौहान यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. चौहान यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी नितीन यांनी एका गाडीत डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती आहे. वैवाहिक वादातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी प्रवीत दल्ता, सासरे प्रेमसिंग दल्ता आणि सासू सुलोचना दल्ता यांना अटक करण्यात आली आहे.
नितीन यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. एक सुसाईड नोट नितीन यांनी आत्महत्या केलेल्या गाडीत होती, तर दुसरी नितीन यांच्या निवासस्थानातून जप्त करण्यात आली. या चिठ्ठ्यांमध्ये त्यांनी सासरच्या मंडळींना आत्महत्येस जबाबदार ठरवलं आहे.
दल्ता कुटुंब आपल्याला मुलांची भेट घेऊ देत नसल्याचं आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवत असल्याचा आरोप नितीन यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement