एक्स्प्लोर
VIDEO | क्रेझी फॅनची प्रभासच्या गालावर चापटी, प्रभासची रिअॅक्शन...
आनंदाच्या भरात तरुणीने प्रभासच्या गालावर चापटी लगावली. खरं तर आपण स्वप्नात तर नाही ना, हे बघण्यासाठी प्रभासला स्पर्श करण्याची तिची इच्छा असावी, मात्र आनंदाने ती इतकी गहिवरली होती, की तिच्या हाताचा जोरात फटका प्रभासच्या गालावर बसला.
मुंबई : चित्रपटातील कलाकारांना चाहत्यांच्या प्रेमाची आणि वेडेपणाची सवयच असते. एखादा क्रेझी फॅन उत्साहाच्या भरात काय करेल, सांगता येत नाही. असाच काहीसा अनुभव 'बाहुबली' सुपरस्टार प्रभासला आला. एका अतिउत्साही तरुणीने फोटोनंतर चक्क प्रभासच्या गालावर चापटी मारली.
'बाहुबली 2'नंतर प्रभासने 'साहो' चित्रपटावर लक्ष केंद्रित केलं आहे. सुजितने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी जगभरात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने प्रभास नुकतास लॉस अँजेलेसला गेला होता. त्यावेळी परतताना विमानतळावर त्याला फॅनच्या क्रेझीनेसचा अनुभव आला.
लॉस अँजेलेस विमानतळावर प्रभासला पाहून काही जण आनंदाने बेभान झाले. त्यांनी प्रभाससोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. प्रभासनेही त्यांना नाराज न करता, तात्काळ होकार दिला. फोटो काढल्यानंतर संबंधित तरुणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. आनंदाच्या उकळ्या फुटून ती जोरात उड्या मारु लागली.
आनंदाच्या भरात तरुणीने प्रभासच्या गालावर चापटी लगावली. खरं तर आपण स्वप्नात तर नाही ना, हे बघण्यासाठी प्रभासला स्पर्श करण्याची तिची इच्छा असावी, मात्र आनंदाने ती इतकी गहिवरली होती, की तिच्या हाताचा जोरात फटका प्रभासच्या गालावर बसला.
चाहतीचा हा आवेश पाहून प्रभासही क्षणभर बावचळला. मात्र हे चाहत्यांचं प्रेम आहे, हे त्याच्या लक्षात आलं. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून सर्वजण लोटपोट हसत आहेत.
प्रभासने 'कॉफी विथ करण'मध्ये उपस्थिती लावली असताना करणने त्याला चाहत्यांविषयी विचारलं होतं. तेव्हा 'चाहत्यांचा गराडा पाहून मी ओशाळून जातो' अशी प्रांजळ कबुली त्याने दिली होती. 'फिमेल फॅन्सनी तर दूर राहावं आणि माझ्यावर प्रेम करावं' असंही तो बोलून गेला होता.
पाहा व्हिडिओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement