एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मोहेंजोदारो'फेम अभिनेत्री पूजा हेगडेला 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' प्रकरणी अटक?
अभिनेत्री पूजा हेगडे मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केल्याच्या अफवांमध्ये तथ्य नसल्याचा दावा तिच्या मॅनेजरने केला आहे.
!['मोहेंजोदारो'फेम अभिनेत्री पूजा हेगडेला 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' प्रकरणी अटक? Pooja Hedge manager quashes rumors of her drunk-driving 'मोहेंजोदारो'फेम अभिनेत्री पूजा हेगडेला 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' प्रकरणी अटक?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/13232558/Pooja-Hegde-GettyImages-1130159681.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फोटो सौजन्य : गेट्टी इमेज
मुंबई : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'मोहेंजोदारो' चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा हेगडे हिने हैदराबादमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्यामुळे पोलिसांनी अटक केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या अफवांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचा दावा पूजाच्या मॅनेजरने केला आहे.
पूजाची भूमिका असलेला 'महर्षी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी हैदराबादमध्ये आयोजित एका इव्हेंटहून हॉटेलकडे जाताना पूजा मद्यधुंद अवस्थेत होती आणि पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं, अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र पूजा हेगडेच्या मॅनेजरने हा दावा तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे.
इव्हेंटनंतर पूजाला विमानतळावर जाण्यासाठी चित्रपटाच्या टीमकडून वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. पूजाचं फ्लाईट मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी असल्यामुळे त्यानुसार कार आणि ड्रायव्हर तिच्या दिमतीला होते. महत्त्वाचं म्हणजे अनोळखी शहरात ड्रायव्हिंग करण्याचं धैर्य पूजा करणारच नाही, असंही पूजाच्या व्यवस्थापकाने स्पष्ट केलं.
ढॅण्टॅढॅण : 'डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह', 'ड्राय डे'च्या टीमची अनोखी मोहीम
'पूजा हेगडेच्या विरोधातील हे वृत्त बनावट आहे. खोटी बातमी छापणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे' अशी माहितीही पूजातर्फे मॅनेजरने दिली. या अफवेत तथ्य असतं, तर तिच्याविरोधात पोलिस तक्रार आढळली असती, याकडेही मॅनेजरने लक्ष वेधलं.
28 वर्षीय पूजा हेगडेचं बालपण आणि शिक्षण मुंबईतच झालं. 2009 साली पूजा फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. स्पर्धेत मिस इंडिया टॅलेंटेडचा किताब जिंकूनही ती प्राथमिक फेरीतच बाद झाली. मिस युनिव्हर्स इंडिया 2010 मध्ये पूजा सेकंड रनर अप ठरली होती.
2012 साली पूजाने तामिळ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. 2016 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मोहेंजोदारो' चित्रपटात ती अभिनेता हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये झळकली. मोहेंजोदारो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे पूजाही बॉलिवूडमध्ये फारशी चमक दाखवू शकली नाही.
आता 'हाऊसफुल 4' या आगामी चित्रपटात पूजा अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, नवाझुद्दीन सिद्दीकी या सारख्या कलाकारांच्या फौजेसोबत दिसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)