Pathaan OTT Release Date: 'पठाण' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या
ओटीटी (Pathaan) रिलीजबाबत नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटबाबत देखील मोठी माहिती समोर आली आहे.
Pathaan OTT Release Date: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. न्यायालयाने चित्रपटाला सबटायटल्स, क्लोज कॅप्शन आणि ऑडिओ डिस्क्रिप्शन जोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे सर्व बदल ओटीटी रिलीजबाबत सांगण्यात आले आहेत. यावेळी चित्रपटाची ओटीटी रिलीज डेटबाबत देखील खुलासा करण्यात आला आहे.
बार अँड बेन्चच्या रिपोर्टनुसार, पठाण हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 25 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्स बॅनरच्या 'पठाण' मध्ये काही बदल करण्यास सांगितले आहे. न्यायालयाने ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वी पठाणमध्ये काही बदल करण्याच्या सूचना देताना म्हटले आहे की, चित्रपटाला सबटायटल्स, क्लोज कॅप्शन आणि ऑडिओ डिस्क्रिप्शन अॅड करावेत, जेणेकरून दृष्टिहीन लोकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा आनंद घेता येईल. बदल केल्यानंतर उच्च न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना सीबीएफसीककडून (CBFC) पुन्हा प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे.'
न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना ओटीटी रिलीजसंदर्भात 20 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सीबीएफसीला 10 मार्चपर्यंत निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे.
The court therefore directed the producers to submit the close captioning, subtitles and audio description to CBFC for the movie's OTT release by Feb 20. CBFC will take a decision on the same by March 10.
— Bar & Bench (@barandbench) January 16, 2023
The movie is set to release on @PrimeVideo on April 25.
शाहरुखचे आगामी चित्रपट
पठाण व्यतिरिक्त शाहरुख हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच त्याचा 'जवान' हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: