Javed Akhtar was in Pakistan: मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी कशी प्रतिक्रिया दिली? जावेद अख्तर यांनी म्हटले...
'26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत.' असं वक्तव्य गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानामधील एका कार्यक्रमात केलं.
Javed Akhtar was in Pakistan: गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) हे सध्या त्यांनी पाकिस्तानामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. पाकिस्तानामध्ये (Pakistan) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये त्यांनी '26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत.' असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. आता एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांना त्यांच्या वक्तव्यानंतर मिळालेल्या रिस्पॉन्सबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले जावेद अख्तर?
जावेद अख्तर यांनी एनडीटिव्ही इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, 'सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांनी माझ्या वक्तव्याशी सहमती दर्शवली. तिथे भारताचे कौतुक करणारे, आपल्याशी संबंध ठेवू इच्छिणारे अनेक लोक आहेत. तिथे मला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच प्रेम मिळालं आणि सन्मानं देखील मिळाला.'
जावेद अख्तर यांचा व्हायरल व्हिडीओ
जावेद अख्तर यांचा लाहोरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हारून रशीद यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जावेद अख्तर हे 'जिंदगी आ रहा हूं मैं' हे गाणं गाताना दिसत आहेत. 'सीमेपलीकडील आपल्या बंधू-भगिनींसोबत संगीत आणि कवितेची संध्याकाळ अनुभवण्याचा हा दुर्मिळ आनंद आहे. लाहोरमध्ये मास्टर जावेद अख्तर साहेब आले होते.' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
Such a rare pleasure and a privilege to have an evening of music and poetry with our brothers and sisters from across the border. The master Javed Akhtar Sahib in Lahore-it doesn’t get better than this. pic.twitter.com/2EaptI5lOu
— Haroun Rashid (@HarounRashid2) February 19, 2023
काय म्हणाले जावेद अख्तर?
पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर म्हणाले, 'आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला कसा झाला? ते आम्ही पाहिले. ते लोक ना नॉर्वेतून आले होते ना इजिप्तमधून आले होते, ते हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत. एखाद्या भारतीयाने याबद्धल छेडलं तर वाईट वाटू देऊ नका.'
'आम्ही नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तुमच्या देशात तर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: