Oscars 2023 : 'Everything Everywhere All At Once' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; 'ऑस्कर 2023'मध्ये पटकावले 7 पुरस्कार
Everything Everywhere All At Once : 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' या सिनेमाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.
Everything Everywhere All At Once Oscars 2023 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळा (Oscars 2023) धामधुमीत पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या वर्षी कोणत्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. अखेर 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' (Everything Everywhere All At Once) या सिनेमाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.
Best Picture goes to...'Everything Everywhere All At Once' Congratulations! #Oscars #Oscars95 pic.twitter.com/lYJ68P97qf
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
'ऑस्कर 2023'मध्ये 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' या सिनेमाला वेगवेगळ्या श्रेणीमध्ये नामांकने मिळाली होती. अखेर नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने 7 पुरस्कार पटकावले आहेत. पण तरीदेखील हा सिनेमा 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'Slumdog Millionaire' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकलेला नाही.
'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' कुठे पाहू शकता?
'ऑस्कर 2023'मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरलेला 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' हा सिनेमा प्रेक्षक प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. नील क्वान आणि डॅनियल शेइनर्टने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स'ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाल्यानंतर सिनेमाच्या टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स'चं कथानक काय आहे?
'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' हा सिनेमा एका चिनी महिलेच्या आयुष्यावर आधारित आहे. अनपेक्षित साहसाचा सामना केल्यानंतर महिलेला एका दुसऱ्याच विश्वात जावं लागतं. त्या महिलेल्या अवती-भोवती फिरणारं सिनेमाचं कथानक आहे.
'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स'ला मिळालेले 11 नामांकन
'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' या सिनेमाला 'ऑस्कर 2023'मध्ये सर्वाधिक 11 नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईन अशा अनेक श्रेणींमध्ये या सिनेमाला नामांकन मिळालं होतं.
सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत 'या' सिनेमांचा होता समावेश
ऑल क्वॉईट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स, टार, वीमेन टॉकिंग, ट्रँगल ऑफ सॅडनेस या सिनेमांचा समावेश सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीत होता.
संबंधित बातम्या