World Diabetes Day: जागतिक मधुमेह दिनानिमित्त निक जोनासची खास पोस्ट; म्हणाला, 'वजन कमी होणे, चिडचिड अन्... '
आज जागतिक मधुमेह दिन आहे. यानिमित्तानं निकनं (Nick Jonas) एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
![World Diabetes Day: जागतिक मधुमेह दिनानिमित्त निक जोनासची खास पोस्ट; म्हणाला, 'वजन कमी होणे, चिडचिड अन्... ' nick jonas tell about 4 symptoms he faced before getting diagnosed with type 1 diabetes share video World Diabetes Day: जागतिक मधुमेह दिनानिमित्त निक जोनासची खास पोस्ट; म्हणाला, 'वजन कमी होणे, चिडचिड अन्... '](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/14/510a62aee4afeff872eb115b794708201668408329585259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nick Jonas: प्रसिद्ध गायक निक जोनास (Nick Jonas) हा सोशल मीडियावर (Social Media) अॅक्टिव असतो. निक हा त्याच्या पत्नीसोबतचे म्हणजेच प्रियांका चोप्रासोबतचे (Priyanka Chopra) फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. तसेच अनेकवेळा तो मुलीचा फोटो देखील शेअर करतो. निक हा टाइप-1 मधुमेहाचा (Type 1 Diabetes) सामना करत आहे. आज जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) आहे. यानिमित्तानं निकनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं टाइप-1 मधुमेहाची त्याला जाणवलेली लक्षणे सांगितली.
निक जोनासनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून निकनं त्याला जाणवलेली टाइप-1 मधुमेहाची लक्षणं सांगितली. या व्हिडीओला निकनं कॅप्शन दिलं, 'टाइप 1 मधुमेहाची चार लक्षणं मला जाणवली होती. जास्त तहान, वजन कमी होणे, वारंवार लघवी होणे आणि चिडचिड होणे ही लक्षणं मला जाणवली होती.' व्हिडीओ शेअर करुन निकनं World Diabetes Day या हॅशटॅगचा वापर केला आहे.
निकनं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता आर. माधवननं देखील निकनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
निक मधुमेहाबाबत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना टाइप-1 मधुमेह याची माहिती देतो. निक हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. 2018 मध्ये निकनं प्रियांका चोप्रासोबत लग्नगाठ बांधली. निक आणि प्रियांका यांना 'मालती मेरी चोप्रा जोनास' नावाची मुलगी आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)