Priyanka Chopra : प्रियांकानं शेअर केला 'पर्फेक्ट फॅमिली फोटो'; मालती आणि निकसोबत पूलमध्ये करतेय एन्जॉय
नुकताच एक क्युट फोटो प्रियांकानं (Priyanka Chopra) सोशल मीडियावर शेअर केला.
![Priyanka Chopra : प्रियांकानं शेअर केला 'पर्फेक्ट फॅमिली फोटो'; मालती आणि निकसोबत पूलमध्ये करतेय एन्जॉय priyanka chopra shares picture with nick jonas and daughter malti Priyanka Chopra : प्रियांकानं शेअर केला 'पर्फेक्ट फॅमिली फोटो'; मालती आणि निकसोबत पूलमध्ये करतेय एन्जॉय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/2197596494b38a8d0b64787f6902e3371659935236_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला अनेक जण ग्लोबल स्टार देखील म्हणतात. काही दिवसांपूर्वी निक जोनास (Nick Jonas) आणि प्रियांकाने आपल्या लेकीचे स्वागत केले होते. मुलीच्या जन्माचा आनंद तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता.
प्रियांका आणि निकनं त्यांच्या मुलीचं नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असं ठेवलं. निक आणि मालतीसोबतचे फोटो प्रियांका सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. आता नुकताच एक क्युट फोटो प्रियांकानं शेअर केला. या फोटोमध्ये प्रियांका, निक आणि मालती हे तिघे एका पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.
प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये मालतीचा चेहरा हार्ट इमोजीनं झाकलेला दिसत आहे. तर मालतीच्या डोक्यावर हॅट देखील दिसत आहे. प्रियांकाच्या या 'पर्फेक्ट फॅमिली फोटो'ला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
पाहा फोटो:
प्रियांका कधी दाखवणार मुलीचा चेहरा?
मालती आता 6 महिन्यांची झाली आहे. मात्र, अजूनही प्रियांकाने तिच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवलेला नाही. एका मुलाखतीमध्ये जेव्हा प्रियांकाच्या आईला याबाबत प्रश्न विचारला तेव्हा आईने खुलासा केला की, 'प्रियांका कदाचित मालती मेरीच्या पहिल्या वाढदिवसाला तिचा चेहरा चाहत्यांना दाखवेल.’
प्रियांकाची सिटाडेल ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
वाचा इतर बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)