Nana Patekar : प्रकाश झा यांच्या आगामी सीरिजमधून नाना पाटेकर करणार कमबॅक, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमबॅक प्रोजेक्टबाबत अनेक खुलासे केले आहेत. प्रकाश झा यांच्या वेब सीरिजमधून मी पुनरागमन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Nana Patekar : बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे केवळ उत्तम अभिनेतेच नाहीत, तर ते लेखक आणि चित्रपट निर्मातेही आहेत. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच प्रभावित केले आहे. त्याच्या खास संवाद शैलीसाठी ते विशेष ओळखले जातात. नाना पाटेकर फिल्म इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहेत. अभिनेते नाना पाटेकर बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. मात्र, नाना पाटेकर ‘आश्रम 4’मध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
आता नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमबॅक प्रोजेक्टबाबत अनेक खुलासे केले आहेत. प्रकाश झा यांच्या वेब सीरिजमधून मी पुनरागमन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, ही वेब सीरिज ‘आश्रम’ नसून ‘लाल बत्ती’ असणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, ‘लाल बत्ती’ ही सामाजिक राजकीय वेब सीरिज असणार असून, या मालिकेद्वारे नाना पाटेकर आणि प्रकाश झा पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.
‘लाल बत्ती’मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
यापूर्वी दोघांनी 'राजनीती' चित्रपटात एकत्र काम केले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नाना पाटेकर यांनी स्वतः या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. ते स्वतः म्हणाले की, हो मी तो प्रोजेक्ट करत आहे. ‘लाल बत्ती’ ही अशीच एक वेब सीरिज आहे, जी राजकारणाची काही काळी सत्य उघड करेल.
या वेब सीरिजमध्ये नाना पाटेकर एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. नाना हे बॉलिवूडचे एक दमदार अभिनेते आहेत आणि त्यांच्या पुनरागमनाची बातमी त्यांच्या चाहत्यांना नक्कीच सुखावणारी आहे.
‘आश्रम 4’ही चर्चेत!
प्रकाश झा यांची ‘आश्रम’ ही वेब सीरिज प्रचंड चर्चेत आहे. आत्तापर्यंत त्यांच्या एमएक्स प्लेअरवरील 'आश्रम' या वेब सीरिजचे एकूण 3 सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि चौथा सीझनही लवकरच रिलीज होणार आहे. बॉबी देओल स्टारर ही वेब सीरिज एका भोंदू बाबाची आणि धर्माच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्या त्याच्या आश्रमाच्या कथेभोवती फिरते. ही सीरिज खूप लोकप्रिय झाली आहे.
हेही वाचा :