एक्स्प्लोर
Advertisement
कुणाच्याही हातून पुरस्कार स्वीकारला, तरी किंमत कमी होत नाही : नाना
राष्ट्रीय पुरस्कारांसारखा प्रतिष्ठित पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते न मिळाल्यानं अनेक कलावंत नाराज झाले आहेत. व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.
पुणे : कुणाच्याही हातून जरी पुरस्कार स्वीकारला, तरी त्याची किंमत काही कमी होत नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पुरस्कारांच्या संदर्भात झालेल्या वादावर अभिनेते नाना पाटेकर यांनी भाष्य केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यास काही पुरस्कार विजेत्या कलाकारांनी नाराजी दर्शवली होती. त्यावर पुण्यातील संवाद-मराठी चित्रपट संमेलनात नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केले.
नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले?
“मला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ते राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले, याचा मला आनंद वाटला. यात स्मृती इराणी कमी आहेत किंवा त्यांना खाली दाखवण्याचं काही कारण नाही. पण ही वेळ जर माझ्यावर आली असती, तर मी नाराजी बोलून दाखवली नसती. मी कुण्याचाही हातून जर पुरस्कार घेतला तर त्याची किंमत काही कमी होत नाही.”, असे नाना पाटेकर यांनी म्हटले.
संवाद -मराठी चित्रपट संमेलनात नाना पाटेकर यांच्या हस्ते विक्रम गोखलेंचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम झल्यांनातर नाना पाटेकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या निर्णयाचंही समर्थन केलं. “सुविधा या महत्वाच्या असतात. त्यामुळे जे कुणी याला विरोध करत असतील, त्यांनी विरोध करु नये, अशी विनंती मी करतो”, असं नाना म्हणाले.
वाद काय आहे?
राष्ट्रीय पुरस्कारांसारखा प्रतिष्ठित पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते न मिळाल्यानं अनेक कलावंत नाराज झाले आहेत. व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला. मात्र नाराज कलावंतांनी मनाचा मोठेपणा दाखवत इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत सोहळ्याचं मोठेपण जपलं. मात्र तीव्र आणि उघड शब्दात नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारपर्यंत कठोर संदेशही पोहोचवला.
दरम्यान, या वादंगानंतर शेवटचे 11 पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्यात आले. मात्र एका कलावंताच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठीही राष्ट्रपतींकडे वेळ नाही का?, असा सवाल उपस्थित होतो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement