मुकेश छाब्रा रियावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
दिग्दर्शक मुकेश छाब्रा रिया चक्रवर्ती विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर ती कुणाची नावं घेते याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. काही वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी काही नावं आपल्याला मिळाल्याचा दावा केला आहे. यात अनेक नावं आली आहेत. सारा अली खान, राकुल प्रीत सिंग, सिमॉन खंबाटा यांच्यासह कास्टिंग डिरेक्टर आणि दिल बेचारा चित्रपटाचा दिग्दर्शक मुकेश छाब्राचं नावही आलं आहे. यामुळे मुकेश संतापला आहे.
रियाने माझं नाव का घेतलं मला याची कल्पना नाही. पण तिने सूडबुद्धीने माझं नाव घेतलं आहे, असा दावा तो करतो. मुकेश आपला खुलासा करताना म्हणाला, मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. मी मद्यप्राशन करत नाही मी धुम्रपान करत नाही. अमली पदार्थांचं सेवन करणं तर फारच दूरची बात असं असताना रियानं माझं नाव का घेतलं ते कळत नाहीय, असा खुलासा मुकेश छाब्राने एका वेबसाईटशी बोलताना केला आहे.
ड्रग्ज प्रकरणात रियानं घेतली सारा, रकुलप्रीतसह 25 सेलिब्रिटींची नावं, NCB चौकशी करणार?
रियाला वाटतं की आपण कुणाचीही नावं घेतली तर आपल्याला सोडतील. पण तसं तिला वाटलं तर तिची ती चूक आहे. शिवाय, मी तिच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. तिने बिनबुडाचे आरोप केलेले आहेत, अंसं मुकेश छाब्रा म्हणतो. मुकेश आणि सुशांत यांची मैत्री इंडस्ट्रीला नवी नाही. दोघांच्या मैत्रीमुळेच दिल बेचारा चित्रपटासाठी सुशांतने अत्यंत कमी मानधन घेऊन काम करायचं निश्चित केलं. आता रियाच्या या आरोपांमुळे मात्र मोठी अडचण उद्भवली आहे.
रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर तिने 20 पानांचा कबुलीजबाब दिल्याचं कळतं. यात तिने काही कलाकार, दिग्दर्शकांची नावं घेतली आहेत. त्यातली काही नावं समोर आली. तिने ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांन एनसीबी समन्स पाठवण्यार असल्याचं कळतं. रियाने इतर कलाकारांची नावं घेतल्यानंतर मात्र ते कलाकार अद्याप काही बोललेले नाहीत.
SSR Suicide Case | रियाकडून 25 नशेबाज बॉलिवूड स्टार्सचा पर्दाफाश; एनसीबीचं मुंबई-गोव्यात धाडसत्र