Mirzapur Season 3 Release : 'मिर्झापूर-3' च्या रिलीज डेटची हिंट, तुम्हाला सोडवता येईल का हे कोडं?
Mirzapur Season 3 Release : चाहत्यांकडून सातत्याने 'मिर्झापूर-3'च्या रिलीज डेटबाबत विचारणा होत आहे, तर, दुसरीकडे निर्माते याची उत्सुकता वाढवत आहेत.
Mirzapur Season 3 Release : 'मिर्झापूर' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पहिले दोन सीझन गाजल्यानंतर आता तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. चाहत्यांकडून सातत्याने 'मिर्झापूर-3'च्या रिलीज डेटबाबत विचारणा होत आहे, तर, दुसरीकडे निर्माते याची उत्सुकता वाढवत आहेत.
मिर्झापूर-3 ही वेब सीरिज या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर आता निर्मात्यांकडून MS3W हे कोडं देण्यात आले आहे. आता चाहत्यांकडून सीरिजच्या रिलीज डेटचे हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
'MS3W' चे कोडं तुम्हाला उलगडणार का?
काही दिवसांपूर्वी मिर्झापूर सीरिजच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर निर्मात्यांकडून कालीन भैय्या, गुड्डू भैय्या आणि मुन्ना भैय्या यांचा फोटो शेअर केला होता. या फोटोत कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) विचारतात की, सध्या MS3W बद्दल खूप चर्चा होत आहे.
लवकर सांग नाही तर...
दुसऱ्या फोटोत गुड्डू भैय्याच्या(अली फजल) फोटोसोबत, MS3W काय आहे, हे सांगितले नाहीतर कहर सुरू होईल, अशी धमकी देताना दिसत आहे. पंकज त्रिपाठीच्या पुढील फोटोत चल आता तरी सांग MS3W काय आहे? किमान तारीख तरी सांग. मुन्ना भैय्याच्या फोटोवर पुन्हा एकदा विचारतो की MS3W काय आहे, हे विचारतो.
View this post on Instagram
MS3W आहे तरी काय?
निर्मात्यांच्या MS3W च्या कोडवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाहत्यांनी हा MS3W चा कोड आपल्या परीने डिकोड करण्याचा प्रयत्न केला आहे. एका युजरने म्हटले की, MS3W चा अर्थ म्हणजे Mirzapur Season 3 When.' तर, दुसऱ्या युजरने म्हटले की, 'MS3W = Month September 3rd Week.' त्याशिवाय एका युजरने 'Mirzapur Season 3 Where.' असा त्याचा अर्थ असल्याचे सुचवले.
रिलीज डेटसाठी चाहते उत्सुक...
अनेक चाहते 'मिर्झापूर-3' ची रिलीज डेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकदा चाहते कमेंट्सही करतात. अनेकदा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर चाहत्यांकडून तिरकस टिप्पणीदेखील करण्यात येते.
एका युजरने तर आता आणखी किती काळ आम्ही प्रतीक्षा करायची असा प्रश्न केला आहे.