Deepika Padukone : चेहऱ्यावर घायाळ करणारे स्मितहास्य अन् प्रेग्नेसी ग्लो; दीपिकाने पहिल्यांदा फ्लॉन्ट केला बेबी बम्प; पाहा व्हिडीओ
Deepika Padukone : दीपिकाने यल्लो कलरच्या स्ट्रेपी ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट केला. प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दीपिकाने बेबी बम्प फ्लॉन्ट केला.
Deepika Padukone : मॉम-टू-बी दीपिका पदुकोणवर (Deepika Padukone) काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोलर्सकडून टीका करण्यात येत आहे. दीपिका पदुकोण ही प्रेग्नेंट नसल्याचे दावा करत अतिशय वाईट शब्दात तिचे ट्रोलिंग करण्यात येत होते. त्यानंतर दीपिकाने आज एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत टीका करणाऱ्यांना चोख उत्तर देत आपण गरोदर असतानाही काम करत असल्याचे दीपिकाने दाखवून दिले आहे.
दीपिकाने गुरुवारी इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत आपण लाईव्ह येणार असल्याचे म्हटले. पण, तिने या मागील कारण दिले नव्हते. त्यामुळे दीपिका ट्रोलिंगला उत्तर देणार का की आणखी काही सांगणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर दीपिकाने इन्स्टावर फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. दीपिकाने या व्हिडीओतून एक प्रकारे ट्रोलर्सलाही उत्तर दिले.
घायाळ करणारे हास्य आणि प्रेग्नेंसी ग्लो...
दीपिकाने यल्लो कलरच्या स्ट्रेपी ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट केला. प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दीपिकाने बेबी बम्प फ्लॉन्ट केला. अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो झळकत आहे. तिच्या स्मित हास्याने चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिकाने सिंपल पण किलर पोझ दिली आहे.
View this post on Instagram
सप्टेंबर महिन्यात होणार आई...
दीपिकाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आल्यानंतर 'दीपवीर'च्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. दीपिका सप्टेंबर महिन्यात आई होणे अपेक्षित आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने सोशल मीडियातून आपण आई-बाबा होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली.
सोशल मीडियावर ट्रोलिंग
मुंबईत मतदानाच्या दिवशी दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसले. त्यावेळी दीपिकाचा बेबी बम्प दिसून आला. दीपिकाचे फोटो, व्हिडीओ पाहून काहींनी ट्रोल करणाऱ्या कमेंट्स केल्या. सोशल मीडियावर काही ट्रोलर्सने दीपिकाच्या गरोदरपणावर प्रश्न उपस्थित केले होते. एका युजरने दीपिका प्रेग्नेंट नसल्याचे म्हटले. तर, एकाने दीपिकाचे बेबी बम्प अजून दिसत नाही, तरी ती अशी का चालतेय असा प्रश्न केला.