Major : बॉक्स ऑफिसवर 'मेजर'चा धमाका; विकेंडला केली दुप्पट कमाई
Major : 'मेजर' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने आतापर्यंत 11.51 कोटींची कमाई केली आहे.
Major : 'मेजर' (Major) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली होती. पण विकेंडला या सिनेमाने दुप्पट कमाई केली आहे. शुक्रवारी या सिनेमाने 27 लाखांची कमाई केली आहे. तर शनिवारी या सिनेमाने थेट 55 लाखांची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 11.51 कोटींची कमाई केली आहे.
'मेजर' सिनेमा संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणीपासून ते मेजरपर्यंतच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. तसेच मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी दहशतवाद्यांचा कसा सामना केला हेदेखील प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
View this post on Instagram
अदिवी शेष या सिनेमात मुख्य भूमिकेत असून तो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. शशी किरण टिक्का दिग्दर्शित या सिनेमात आदिवी शेष व्यतिरिक्त सई मांजरेकर, प्रकाश राज, रेवती, मुरली शर्मा आणि शोभिता धुलीपाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
संबंधित बातम्या
Chakda Xpress : अनुष्का शर्माच्या 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; झुलन गोस्वामींची भूमिका साकारणार
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनला होणार सुरुवात; प्रोमो आऊट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)