Koffee With Karan : 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनला होणार सुरुवात; प्रोमो आऊट
Koffee With Karan Season 7 : 'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे.
Koffee With Karan Season 7 : सिने निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee with Karan) या कार्यक्रमाचा सातवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत.
'कॉफी विथ करण' कधीपासून होणार सुरू?
'कॉफी विथ करण' हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण आता या कार्यक्रमाचे नवे पर्व प्रेक्षकांना प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 7 जुलैपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या कॉफीचा आस्वाद घेत 'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्यामुळे प्रेक्षक आता कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहेत. करणने शेअर केलेल्या प्रोमो व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कियारा आडवाणी, शाहिद कपूर, रणबीर कपूर अशी अनेक नावं चाहते कमेंट्स करत करणला सुचवत आहेत.
'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातीन अनुभव शेअर करत असतात. आमिर खान, शाहरूख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आता हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत. 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनचे पहिल्या भागात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या