एक्स्प्लोर
Advertisement
माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट'ची रीलिजिंग डेट ठरली
माधुरीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन सिनेमाचं नवीन पोस्टर आणि रीलिजिंग डेट प्रसिद्ध केली आहे.
मुंबई : 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमाच्या रीलिजचा मुहूर्त अखेर ठरला आहे. माधुरीची मुख्य भूमिका असलेला 'बकेट लिस्ट' 25 मे रोजी प्रदर्शित होत आहे.
तेजस देऊस्करने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
माधुरीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन सिनेमाचं नवीन पोस्टर आणि रीलिजिंग डेट प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे करण जोहरनेही मराठीमध्ये ट्वीट केलं आहे. 'चल, आता आपण दोघही पूर्ण करुया आपली' असं करणने म्हटलं आहे.Excited for my first Marathi film @karanjohar @DharmaMovies @apoorvamehta18 @AAFilmsIndia @bucketlistfilm produced by @Darkhorsecine @DARPictures @bluemustangcs & directed by @tejasdeoskar #bucketlist #bucketlistonmay25 pic.twitter.com/qXirGQDkEw
— Madhuri Dixit-Nene (@MadhuriDixit) April 3, 2018
'बकेट लिस्ट'मध्ये माधुरी एका सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत असल्याचा अंदाज येतो. 'माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.Proud to present @MadhuriDixit in a Marathi film! On 25th May 2018 चल, आता आपण दोघही पूर्ण करुया आपली #BucketList. Directed by @tejasdeoskar. Produced by @Darkhorsecine @DARPictures @bluemustangcs .@DharmaMovies @apoorvamehta18 @bucketlistfilm @AAFilmsIndia pic.twitter.com/0Ji2Cdx02p
— Karan Johar (@karanjohar) April 3, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement