एक्स्प्लोर
उपचारासाठी माधुरी दीक्षित अमेरिकेला रवाना

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्हीवरील रिअॅलिटी शोची जज माधुरी दीक्षित उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. माधुरी मागील आठवड्यात अमेरिकेत गेल्याचं समजतं. धकधक गर्ल माधुरी दीक्षित मागील अनेक दिवसांपासून खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होती. त्यामुळे उपचारांसाठी तिने अमेरिकेचा रस्ता धरला. सुत्रांच्या माहितीनुसार, खांद्याची वेदना सहन करण्यापलिकडची होती, त्यामुळे याबाबत डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेण्याचा विचार माधुरी केला. एका रिअॅलिटी शोच्या शूटिंगदरम्यान माधुरीने खांदेदुखीमुळे मोठी सुट्टी घेतली होती. चाहते तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
आणखी वाचा























