(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khiladi : रवी तेजाचा 'खिलाडी' 11 फेब्रुवारीला हिंदीतही होणार प्रदर्शित
Ravi Teja : रवी तेजाचा 'खिलाडी' सिनेमा 11 फेब्रुवारीला हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.
Khiladi : रवी तेजाचा बहुप्रतिक्षित 'खिलाडी' (Khiladi) सिनेमा 11 फेब्रुवारीला सिनेमागृहात हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. पेन स्टुडिओ निर्मित या सिनेमात रवी तेजाचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे.
हिंदीत सिनेमा प्रदर्शित झाल्याबद्दल सिनेमाचे निर्माते जयंतीलाल गडा म्हणाले, "प्रेक्षकांना सध्या सत्य घटनेवर आधारित सिनेमे हवे आहेत. रवी तेजाच्या आगामी 'खिलाडी' सिनेमाची कथा अत्यंत मनोरंजक आहे. त्यामुळे हा सिनेमा हिंदी भाषेतही सिनेमागृहात प्रदर्शित व्हावा असे वाटले".
View this post on Instagram
'मास महाराजा' या नावाने प्रसिद्ध असलेल्या रवी तेजा यांची हिंदी भाषिक चाहत्यांमध्येदेखील प्रचंड क्रेझ आहे. यापूर्वी त्यांचे अनेक सिनेमे डब करून यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. बॉलिवूडमध्ये त्यांच्या अनेक सिनेमांचे रिकेमदेखील बनले आहेत.
रवी तेजाचे 'किक', 'राजा: द ग्रेट', 'बंगाल टायगर', 'विक्रमारकुडु' हे सिनेमे हिंदी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. 'खिलाडी' नंतर रवी तेजा 'रामाराव ऑन ड्युटी'मध्ये दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती
Ghoomer : अभिषेक बच्चनने वाढदिवसानिमित्त 'घूमर' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात
Happy Birthday Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायशी लग्नापूर्वी ‘या’ अभिनेत्रींशी जोडले गेले होते अभिषेक बच्चनचे नाव!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha