Kangana Ranaut : गेल्या 12 महिन्यांपासून कंगना सतत आजारी; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'डेंग्यू,कोविड,डेल्टा, स्वाईन फ्लू...'
Kangana Ranaut: कंगानानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.या पोस्टच्या माध्यमातून कंगनानं तिच्या हेल्थबाबत माहिती दिली आहे.
Kangana Ranaut Called Herself Batman: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वक्तव्यांमुळे अनेकवेळा चर्चेत असते. कंगना ही विविध विषयांवरील तिची मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडते. कंगानानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं स्वत:चा उल्लेख बॅटमॅन असा केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून कंगनानं तिच्या हेल्थबाबत माहिती दिली आहे.
कंगनानं तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, 'गेल्या 12 महिन्यात मला डेंग्यू, कोविड, डेल्टा, कोविड-ओमिक्रॉन आणि कोविड + स्वाईन फ्लू सर्वकाही झाले. मी सतत आजारी आहे. कधी कधी आपल्या सर्वांनाच खचल्यासारखं वाटतं. कमकुवत आणि निराश झाल्यासारखं सुद्धा वाटतं. अगदी बॅटमॅनसारख्या लोकांनाही असं वाटू शकतं. चला पुढे जात जाऊयात... सर्वांना फेस्टिवल सीझनच्या शुभेच्छा.'
यापूर्वी कंगनानं स्वतःला बॅटमॅन म्हटले होते. तिने एका इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं 'डाव्या आणि उजव्या दोन्हीही विचारसरणीचे लोक यावर सहमत आहेत की, मी खूप वाईट स्वभावाची व्यक्ती आहे, मी हिंसक आणि अतिरेकी देखील आहे. मला हिंसा आवडते आणि हिंसाचारही मला आवडतो. मी थोडी बिघडलेली आहे आणि खूप हट्टी आहे. तसेच मी टॅलेंडेट देखील आहे. म्हणजे G.O.A.T. सारखी... यालाच म्हणतात बॅटमॅन... मी तेच आहे...' कंगनाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
कंगनाचे आगामी चित्रपट
कंगना ही आता चंद्रमुखी 2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. यानंतर तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट रिलीज होईल. हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुपम खेर, सतीश कौशिक, भूमिका चावला आणि महिला चौधरी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. आता कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
पाहा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर:
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
Jawan Review: 'शाहरुख हा सिनेमाचा देव'; 'जवान'चं कंगनानं केलं तोंडभरुन कौतुक, शेअर केली खास पोस्ट