एक्स्प्लोर
सलमान ज्या तुरुंगात रात्र काढणार, त्याबद्दल ए टू झेड माहिती
सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं.
जोधपूर : 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं.
सलमान खानला जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं आहे. जिथे त्याला बराक क्रमांक दोन मध्ये ठेवण्यात येईल. याच बराकच्या एका भागात आसाराम बापू कैद आहे. सलमानची ही बराक जेलरच्या केबिनजवळच आहे.
बराक क्रमांक दोनमध्ये चार रुम आहेत. अगोदर या बराकला दीड नंबरची बराक म्हणून ओळखलं जात होतं, मात्र नंतर ती तोडून नवीन बनवण्यात आली. तुरुंग प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सलमानला वेगळी रुम दिली आहे. शिवाय त्याला एसी देखील देण्यात आलेला नाही.
जोधपूर तुरुंग सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत मजबूत मानलं जातं. पंजाबमध्ये जेव्हा खालिस्तानचं आंदोलन सुरु होतं, तेव्हा त्या दहशतवाद्यांना याच तुरुंगात ठेवण्यात आलं होतं, असं बोललं जातं. यासोबतच कंधारमध्ये दहशतवाद्यांनी विमानाचं अपहरण करुन प्रवाशांच्या मोबदल्यात दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती, त्यापैकी काही दहशतवादी या तुरुंगात होते.
नेमकं प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.
यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.
कोणकोणत्या केस दाखल
- कांकाणी गाव केस - 5 एप्रिलला फैसला होणार. गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते.
- घोडा फार्म हाऊस केस - 10 एप्रिल 2006 रोजी सीजेएम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सलमान हायकोर्टात गेला. 25 जुलै 2016 रोजी त्याची सुटका करण्यात आली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
- भवाद गाव केस - सीजेएम कोर्टाने 17 फेब्रुवारी 2006 रोजी सलमानला दोषी ठरवून एका वर्षाची सुनावली. हायकोर्टाने या प्रकरणातही सलमानची मुक्तता केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
- शस्त्रास्त्र केस - 18 जानेवारी 2017 रोजी कोर्टाने सलमानची सुटका केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement