एक्स्प्लोर
इरफान पुनरागमनाच्या तयारीत, 'या' सिनेमात झळकणार
कर्करोगाशी झुंज देणारा अभिनेता इरफान खान 'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या सिक्वेलमधून लवकरच पुनरागमन करणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : कर्करोगाशी झुंज देणारा अभिनेता इरफान खान सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र इरफानने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. इरफान 'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या सिक्वेलमधून लवकरच पुनरागमन करणार असल्याची माहिती आहे.
इरफानला न्यूरएंडोक्राईन ट्यूमर झाला असून सध्या तो लंडनमध्ये उपचार घेत आहे. आजाराचं निदान झाल्यावर मार्च महिन्यात इरफानने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली होती.
'हिंदी मीडियम 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी लंडनमध्ये जाऊन इरफानची भेट घेतली. चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवल्यानंतर त्याने होकार दिल्याची माहिती 'बॉलिवूड लाईफ' या वेबसाईटने दिली आहे.
यापूर्वी, उपचारांमुळे इरफानने दोन प्रोजेक्ट्समधून माघार घेतली होती. दीपिका पदुकोणसोबत विशाल भारद्वाज दिग्दर्शित एका चित्रपटातून त्याने बॅकआऊट केलं, तर 'गॉरमिंट' ही राजकीय उपहासात्मक वेब सीरिजही त्याने सोडली. काहीच आठवड्यांपूर्वी त्याची मुख्य भूमिका असलेला 'कारवां' चित्रपट प्रदर्शित झाला होता.
हिंदी मीडियम या 2017 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात इरफानसोबत सबा करीम झळकली होती. साकेत चौधरीने त्याचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमाचा सिक्वेल करण्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती.
'हिंदी मीडियम 2' मध्येही आता इरफान दिसण्याची चिन्हं असून प्रसिद्ध दिग्दर्शक होमी अडजानियांकडे दिग्दर्शनाची धुरा देण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच इरफानवर सहाव्यांदा केमो थेरपी करण्यात आली. पाच केमो थेरपींनंतर इरफानने आपल्याला प्रचंड अशक्तपणा आल्याचं सांगितलं होतं. मात्र इरफानने या सिनेमाला होकार दिला म्हणजेच त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असावी, अशी आशा चाहत्यांना व्यक्त करायला हरकत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
Advertisement