'या' आहेत भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध वेब सीरिज; IMDb नं टॉप-50 वेब सीरिजची यादी केली जाहीर
भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय वेब सीरिजची यादी IMDb नं घोषित केली आहे.
IMDb Top 50 Web Series: IMDb हा चित्रपट, टेलिव्हिजन मालिकांशी संबंधित असणाऱ्या डेटाबेस माहितीचा संग्रह आहे. IMDb (www.imdb.com) या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजच्या सर्वांत प्रसिद्ध सोर्सनं आज भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार आजवरच्या टॉप 50 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय वेब सीरिजची यादी घोषित केली आहे.
“आमच्या यादीमधील सर्वोच्च स्थानी असलेल्या दोन वेब सीरिज (सेक्रेड गेम्स आणि मिर्झापूर) ह्यांना पाच वर्षं पूर्ण झाले आहेत. भारतातील वेब सीरिजच्या छोट्या पण लक्षवेधी इतिहासासंदर्भात आढावा सांगताना आम्हाला आनंद होत आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया यांनी सांगितलं. “स्ट्रीमिंग पर्यायांच्या वाढत्या संख्येसह भारतातील वेब सीरिजमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे.' असंही त्यांनी सांगितलं.
सेक्रेड गेम्सचे सह- दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी सांगितले, “IMDb युजर्सनं सेक्रेड गेम्सला पहिल्या क्रमांकाचे स्थान दिल्याचे कळाल्यानंतर मला अतिशय अभिमान वाटत आहे आणि आनंद होत आहे. या शोवर प्रेम करणा-या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार'
IMDb ची आजवरच्या टॉप 50 सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सीरिजची यादी-
सेक्रेड गेम्स
मिर्झापूर
स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी
द फॅमिली मॅन
अॅस्पेरंट्स
क्रिमिनल जस्टीस
ब्रीद
कोटा फॅक्टरी
पंचायत
पाताल लोक
स्पेशल ओपीएस
असूर: वेलकम टू यूवर डार्क साईड
कॉलेज रोमान्स
अपहरण
फ्लेम्स
धिंडोरा
फर्जी
आश्रम
इनसाईड एज
अनदेखी
आर्या
गुल्लक
टीव्हीएफ पिचर्स
रॉकेट बॉयज
देल्ही क्राईम
कँपस डायरीज
ब्रोकन बट ब्युटीफूल
जामतारा: सबका नंबर आएगा
ताज़ा खबर
अभय
हॉस्टेल डेझ
रंगबाज़
बंदीश बँडीटस
मेड इन हेव्हन
इममॅच्युअर
लिटल थिंग्ज
द नाईट मॅनेजर
कँडी
बिच्छू का खेल
दहन: राकन का रहस्य
जेएल50
राना नायडू
रे
सनफ्लॉवर
एनसीआर डेज
महारानी
मुंबई डायरीज 26/11
चाचा विधायक हैं हमारे
ये मेरी फॅमिली
अरण्यक
1 जानेवारी 2018 ते 10 मे 2023 मध्ये भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजच्या रँकिंगनुसार ही यादी IMDb नं तयार केली आहे.
फर्जी, ताज़ा खबर, द नाईट मॅनेजर, आणि राना नायडू या 2023 मध्ये रिलीज झालेल्या चार वेब सीरिजची नावं या यादीमध्ये आहेत. या यादीतील टॉप 10 सीरिजपैकी सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, आणि क्रिमिनल जस्टीस या तीन सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीने महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या.
जाणून घ्या IMDb विषयी
IMDb हा चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगामधील सर्वांत प्रसिद्ध सोर्स आहे. IMDb ओरिजिनल व्हिडिओ सीरिजची आणि पोडकास्टसची निर्मितीसुद्धा करते. मनोरंजन उद्योगातील व्यावसायिकांसाठी IMDb हे IMDbPro आणि बॉक्स ऑफीस मोजो उपलब्ध करते.
संंबंधित बातम्या