New Release On OTT: ओटीटीवर अॅडव्हेंचर आणि थ्रिलरचा तडका; या आठवड्यात रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सीरिज
New Release On OTT: या आठवड्यात प्रेक्षकांना अॅडव्हेंचर आणि थ्रिलर चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर पाहता येणार आहेत.
New Release On OTT: वीकेंडला ओटीटीवरील (OTT) चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) बघायला प्रेक्षकांना आवडतात. जून महिन्याचा दुसरा आठवड्यात ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज होणार आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना अॅडव्हेंचर आणि थ्रिलर चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर पाहता येणार आहेत. शाहिद कपूरच्या 'ब्लडी डॅडी' पासून ते जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार 2' पर्यंत काही चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. जाणून घेऊयात या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल...
'ब्लडी डॅडी (Bloody Daddy)'
अभिनेता शाहिद कपूरच्या ब्लडी डॅडी या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. शाहिद कपूर स्टारर हा सिनेमा अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला आहे. हा 9 जून रोजी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
'अर्नाल्ड (Arnold)'
अर्नाल्डही डॉक्युमेंट्री हॉलिवूड अभिनेता अर्नाल्डवर आधारित आहे. या अभिनेत्याचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा एक उत्तम चित्रपट असणार आहे. ही डॉक्युमेंट्री 7 जून रोजी प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
'नेवर हॅव आय एव्हर सीजन 4 (Never Have I Ever Season 4)'
नेवर हॅव आय एव्हर या कॉमेडी वेब सीरिजच्या 3 सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता त्याचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सीधन 8 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
View this post on Instagram
'अवतार 2 (Avatar 2)'
जेम्स कॅमेरूनचा हा चित्रपट 7 जूनला डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची बऱ्याच दिवसांपासून या सिनेमाची वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
संंबंधित बातम्या
अॅक्शन, थ्रिलर चित्रपट बघायला आवडतात? Netflix वरील या फिल्म्स नक्की बघा