एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
क्रिश रुपातली गणेशमूर्ती पाहून हृतिकची 'क्रिश 4' ची घोषणा
मुंबई : पोलिसापासून वृद्धापर्यंत आणि बालगणेशापासून दुचाकीस्वारापर्यंत अनेक रुपातल्या गणेशमूर्ती यंदा राज्यभरात पाहायला मिळाल्या. हृतिक रोशनने साकारलेल्या 'क्रिश' या व्यक्तिरेखेच्या रुपातली गणेशमूर्तीही अनेकांचं लक्ष वेधून घेत होती. हीच मूर्ती पाहून रोशन कुटुंबीयांनी क्रिश चित्रपटाच्या पुढच्या आवृत्तीची घोषणा केली आहे.
दिग्दर्शक राकेश रोशन यांनी क्रिश 4 हा चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. अभिनेता हृतिक रोशनने ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे. त्यानंतर क्रिश4 हा हॅशटॅग ट्रेण्डही झाला.
https://twitter.com/iHrithik/status/775910503516344320
'माझ्या पत्नीने क्रिश रुपातल्या बाप्पाचा फोटो मला ट्विटरवर दाखवला. त्यामुळे क्रिश हा आपला सुपरहिरो असल्याची माझी भावना दृढ झाली. माझा आत्मविश्वास वाढला आणि सिनेमाचा चौथा भाग काढण्याची स्फूर्ती मला मिळाली.' असं राकेश रोशन सांगतात.
'गणपती बाप्पा हा मंगलकार्याच्या सुरुवातीचं प्रतीक मानला जातो. त्याचा आशिर्वाद मिळाला क्रिश 4 साठी आहे, त्यामुळे आम्ही आनंदात आहोत.' असंही राकेश रोशन म्हणाले. चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरुवात होईल, तर 2018 च्या नाताळमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल.
कोई मिल गया (2003), क्रिश (2006) आणि क्रिश 3 (2013) या मालिकेतला क्रिश 4 हा चौथा भाग असेल. हृतिक रोशनने तिन्ही चित्रपटांत मुख्य भूमिका साकारली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement