एक्स्प्लोर

Hema Malini : धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी एकमेकांना कधीच भेटल्या नाहीत; 'हे' आहे कारण

धर्मेद्र (Dharmendra) यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर (Prakash Kaur) यांना हेमा मालिनी (Hema Malini) अद्याप भेटलेल्या नाहीत.

Dharmendra Hema Malini : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से आहेत. हेमा मालिनीआधी प्रकाश कौर (Prakash Kaur) यांच्यासोबत धर्मेंद्र लग्नबंधनात अडकले होते. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर अजूनही हेमा मालिनींना भेटलेल्या नाहीत. 

धर्मेंद्र (Dharmendra) आणि प्रकाश कौर (Prakash Kaur) 1954 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. सनी देओल (Sunny Deol), बॉबी देओल (Bobby Deol), विजेता देओल (Vijeyta Deol) आणि अजीता देओल (Ajeeta Deol) ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्या अजूनही प्रकाश कौर यांना भेटलेल्या नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या करण देओलच्या लग्नसोहळ्यातदेखील हेमा मालिनी यांनी हजेरी लावली नव्हती. 

प्रकाश कौर यांना न भेटण्याबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या...

हेमा मालिनी म्हणाल्या की,"माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, अशी माझी इच्छा होती. त्यामुळेच मी प्रकाश कौर यांना कधीच भेटले नाही. माझ्यामुळे कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, असं मला वाटत होतं. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचा मी कायमच आदर करते. धर्मेंद्र यांनी माझ्या मुलींची खूप काळजी घेतली आहे". 

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी काय आहे? (Dharmendra Hema Malini Lovestory)

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या,"एका सिनेमाच्या प्रीमियरदरम्यान धर्मेंद्र आणि मी पहिल्यांदा भेटलो. तेव्हा ते खूपच हँडसम आणि फिट होते. त्यानंतर लगेचच एका सिनेमात एकत्र काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमची चांगली मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र 1980 मध्ये लग्नबंधनात अडकले. 

'अॅक्शन हीरो' असण्यासोबत धर्मेंद्र रोमॅंटिक सिनेमाचा बादशहा होते. त्यांचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होते. तसेच त्यांच्या अफेअर्सच्या चर्चाही रंगल्या होत्या. 'धर्मेंद्र' यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल (Dharam Singh Deol) असे आहे. पण ते 'धर्मेंद्र' याच नावाने परिचित आहेत. 

संबंधित बातम्या

Hema Malini आणि Dharmendra च्या लग्नाबद्दल अभिनेत्याची पहिली पत्नी प्रकाश म्हणाल्या,"मी हेमा मालिनीच्या जागी असते तर असं पाऊल..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्तनालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget