![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hema Malini आणि Dharmendra च्या लग्नाबद्दल अभिनेत्याची पहिली पत्नी प्रकाश म्हणाल्या,"मी हेमा मालिनीच्या जागी असते तर असं पाऊल..."
Hema Malini Dharmendra Wedding : हेमा मालिनीआधी धर्मेंद्र यांच प्रकाश कौरसोबत लग्न झालं होतं.
![Hema Malini आणि Dharmendra च्या लग्नाबद्दल अभिनेत्याची पहिली पत्नी प्रकाश म्हणाल्या, Hema Malini Dharmendra first wife prakash kaur reaction on hema malini and Dharmendra Wedding know details Hema Malini आणि Dharmendra च्या लग्नाबद्दल अभिनेत्याची पहिली पत्नी प्रकाश म्हणाल्या,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/a06f5c97a31af5889d69fb8830ee68c91687768329880254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hema Malini Dharmendra Prakash Kaur Reaction : सनी देओलचा (Sunny Deol) लेक करण देओल (Karan Deol) नुकताच लग्नबंधनात अडकला असून त्यांच्या लग्नानंतर आता देओल कुटुंबीय चर्चेत आले आहेत. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर (Prakash Kaur) ग्लॅमरस जगापासून दूर असली तरी करण देओलच्या लग्नसोहळ्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रकाश कौर, धर्मेंद्र आणि सनी देओल यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. करण देओलच्या लग्नसोहळ्यात धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) आणि तिच्या मुलींनी हजेरी लावली नव्हती. हेमा मालिनीसोबत लग्नबंधनात अडकण्याआधी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट घेतलेला नव्हता.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट कुठे झाली? (Dharmendra And Hema Malini First Meet)
'तुम हसीन मैं जवान' (Tum Haseen Main Jawaan) या सिनेमाच्या सेटवर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट झाली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र जेव्हा हेमा मालिनीच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांचं प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झालेलं होतं आणि त्यांना चार मुलंदेखील होते.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर म्हणाल्या,"फक्त माझा पतीच का? कोणताही पुरुष आपली पत्नी म्हणून हेमा मालिनीचा विचार करू शकतो. अर्ध्या इंडस्ट्रीची हीच परिस्थिती आहे. अनेक कलाकारांचं लग्न झालेलं असंल तरी ते कोणासोबत तरी रिलेशनमध्ये आहेत आणि दुसरं लग्न करत आहेत".
ते चांगले पती नाहीत : प्रकाश कौर
प्रकाश कौर पुढे म्हणाल्या,"धर्मेंद्र एक चांगले पती नसले तरी माझ्यासाठी मात्र ते खूपच चांगले होते. तो एक उत्सृष्ट बाबा होता. मुलांचं त्यांच्यावर आणि त्यांचं मुलांवर खूप प्रेम होतं. हेमा मालिनी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे मी समजू शकते. पण त्यांच्या जागी मी असते तर त्यांनी जे केलं ते कधीच केलं नसतं. अर्थातच त्यांच्या भावनांचा मी आदर करते. पण एक पत्नी आणि आई असल्याने मला हे मान्य नाही".
संबंधित बातम्या
Dharmendra and Hema Malini Love Story: विवाहित धर्मेंद्र देओल यांच्या प्रेमात पडल्या होत्या हेमा मालिनी; वीरु आणि बसंतीची हटके लव्ह-स्टोरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)