'हिरामंडी' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, होणाऱ्या बाळासाठी शेअर केली खास पोस्ट
Heeramandi Actress Pregnant : 'हिरामंडी' फेम अभिनेत्री प्रेग्नंट असून तिने होणाऱ्या बाळासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट करत खास संदेश लिहिला आहे.
मुंबई : हिरामंडी फेम अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच रिचा चढ्ढा 'हिरामंडी'मध्ये लज्जोच्या भूमिकेत झळकली होती. लज्जो असो किंवा 'फुकरे' चित्रपटातील भोली पंजाबन, रिचाने प्रत्येक भूमिकेवर आपली छाप पाडली आहे.
'हिरामंडी' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई
रिचा चढ्ढा तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चांगलीच चर्चेत असते. रिचा लवकरच आई होणार असून सध्या प्रेग्नंसीच्या काळातील अनुभव चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच रिचाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. होणाऱ्या बाळासंदर्भात रिचाने केलेल्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने पोस्ट करत कळी फुलण्याची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
होणाऱ्या बाळासाठी शेअर केली खास पोस्ट
अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या प्रेग्नंट आहे. रिचा सध्या गर्भधारणेच्या टप्प्याचा आनंद घेत आहे. लवकरच रिचा तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आता नुकतीच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहेत. या पोस्टमध्ये ती होणाऱ्या बाळासाठी खास संदेश लिहिला आहे.
रिचा गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात
अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या तिच्या प्रेग्नंसीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर स्वतःचे दोन सुंदर फोटो शेअर करत होणाऱ्या बाळासाठी खास पोस्ट लिहिली आहे. हे फोटो शेअर करताना रिचाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''ही अस्वस्थता एकाकीपणामुळे आहे, पण याचं कारण म्हणजे मी एकटी नाही. एका छोट्याशा हालचालीची, गुडघ्याची, अचानक लाथ मारण्याची, कोणीतरी आपलं बोलणं ऐकत असल्याची, मला सतत आठवण होतं असते. कळी उमलण्याची वाट पाहत असलेली कळीची सतत आठवण येते. आजा यार.''
रिचाच्या या पोस्टवर सेलिब्रिटींच्या कमेंट
रिचा चढ्ढाच्या या इंस्टा पोस्टवर अभिनेता आयुषमान खुराना याची पत्नी आणि लेखिका ताहिरा कश्यप आणि सबा पतौडी यांनीही कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. ताहिराने कमेंट सेक्शनमध्ये "आजा यार" लिहिलं आहे. तर सबाने हार्ट इमोजी शेअर केला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसह रिचाच्या पोस्टवर चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव करत रिचा आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.