Happy Birthday Rahul Bose : अभिनय क्षेत्रच नव्हे, तर खेळांमध्येही तरबेज असणारा बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता राहुल बोस!
Rahul Bose Birthday : बॉलिवूड अभिनेता राहुल बोस आज त्याचा 55वा वाढदिवस साजरा करत आहे.
Rahul Bose Birthday : अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) हा बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे, जो केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर सामाजिक कार्यातही खूप सक्रिय असतो. राहुल अनेकदा समाजसेवेत भाग घेत असतो. बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा अभिनेता अनेक खेळांमध्येही तरबेज आहे. राहुलचा जन्म 27 जुलै 1967 रोजी बंगळुरूमध्ये झाला. बॉलिवूड अभिनेता राहुल बोस आज त्याचा 55वा वाढदिवस साजरा करत आहे.
त्याला अभिनयाची आवड अगदी बालपणापासूनच होती. राहुल बोसने वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून शाळेतील नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्याने 'द परफेक्ट मर्डर' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले. तो 'बॉम्बे बॉईज' या चित्रपटात नसीरुद्दीन शाहसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला. परंतु, त्याला 'मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या चित्रपटामुळे अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. राहुलने अनेक बंगाली, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.
क्रिडाक्षेत्रातही सक्रिय अभिनेता!
चित्रपट विश्वात पदार्पण करण्यापूर्वी त्याने खेळाडू म्हणूनही नशीब आजमावले होते. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणारा तो भारतीय रग्बी संघाचा खेळाडू होता. रग्बीशिवाय राहुल बोसने क्रिकेटमध्येही नशीब आजमावले. त्याने सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. एवढेच नाही, तर बॉक्सिंग स्पर्धेतही त्याने रौप्य पदक मिळवले होते. पण, नंतर राहुल बोसचे मन चित्रपटांकडे वाळू लागले. 'द परफेक्ट मर्डर' चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण करणाऱ्या अभिनेता राहुल बोसने 'प्यार के साईड इफेक्ट्स', 'मान गए मुगल-ए-आझम', 'झंकार बीट्स', 'कुछ लव जैसा', 'चमेली', 'शौर्य', ‘चेनकुली की मेनकुली’ आणि 'दिल धडकने दो' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला.
अभिनयासोबतच राहुलने काही चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. राहुल बोस याला सामाजिक कार्यात रस असून, तो या क्षेत्रातही भरपूर काम करत आहेत. राहुल सोशल मीडियावरही सक्रिय असून, त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.
हेही वाचा :