एक्स्प्लोर
गीता फोगाटचे खरे कोच आमीरच्या 'दंगल'वर नाराज
मुंबई : आमीर खानच्या 'दंगल' सिनेमात आपली व्यक्तीरेखा निगेटिव्ह दाखवल्याने पैलवान गीता फोगाटचे खरे प्रशिक्षक नाराज आहेत. सिनेमात आपली व्यक्तीरेखा खलनायकाची दाखवल्यामुळे प्रशिक्षक प्यारा राम सोंधी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत.
पण प्यारा राम त्याआधी त्यांच्या निकटवर्तीयांशी चर्चा करणार आहेत. "सिनेमात दाखवलेल्या माझ्या व्यक्तिरेखेबाबत मी आधी आमीरशी बोलणार आहे. जर माझं समाधान झालं तर या प्रकरणी कायदेशीर कारवाई पण करणार. आमीरसारख्या मोठ्या कलाकाराकडून ही अपेक्षा नव्हती," असंही ते म्हणाले.
"लुधियानामध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना मी माझ्या तीन सहकाऱ्यांसोबत सेटवर गेलो होतो. तिथे आमची भेट आमीर खान आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासोबत झाली. पण त्यांनी सिनेमाच्या कोणत्याही सीनबाबत आमच्याशी बातचीत केली नाही. इतकंच नाही तर चित्रपटात काय दाखवणार हेदेखील माहित नव्हतं. हा सिनेमा महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित आहे, एवढचं मला माहित होतं," असं प्यारा राम यांनी सांगितलं.
प्रशिक्षक प्यारा राम सोंढी यांच्या मते, "महावीर फोगाट सज्जन व्यक्ती असल्याचं सगळ्यांनाच माहित आहे. त्यांनी कधीच आमच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मुलींच्या सामन्यांवेळी ते अनेकवेळा नसायचेच. 'दंगल' पाहून आल्यानंतर माझ्या एका शिष्याने विचारलं की, 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये तुम्हीच प्रशिक्षक होता ना?. मी त्यावर हो बोललो. पुढे त्याने विचारलं की, फायनलआधी तुम्ही गीताच्या वडिलांना खरंच अंधाऱ्या खोलीत डांबलं होतं? ही माझ्यासाठी आश्चर्यकारक बाब होती, कारण असं कधीचं घडलं नव्हतं.
राष्ट्रीय पुरुष संघाचे प्रशिक्षक विनोद कुमार यांनीही प्यारा राम सोंधी यांचं समर्थन केलं आहे. "नॅशनल कॅम्पदरम्यान गीताचे वडील पटियालामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होते. पण त्यांनी कधीही प्रशिक्षकांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान, सुरक्षा एवढी कडेकोट होती की, असं करण शक्यच नाही," असं विनोद कुमार म्हणाले.
कोणत्या सीनवर आक्षेप?
सिनेमात एक सीन आहे, ज्यात गीताचा अंतिम सामना असतो, तेव्हा प्रशिक्षक कट रचून तिच्या वडिलांना एका खोलीत डांबून ठेवतो. गीताच्या यशाचं श्रेय वडिलांना मिळू नये, यासाठी प्रशिक्षक हे कृत्य करतो. या कटात यशस्वी झाल्यानंतर कोचचा एक डायलॉग आहे, क्रेडिट मेरे पप्पा को जाता है, जा ले ले क्रेडिट! अंधाऱ्या खोलीत बंद असलेल्या महावीर यांना गीताचा अंतिम सामना पाहता येत नाही. प्यारा राम म्हणाले की, चित्रपट रंजक बनवण्यासाठी हे सगळं केलं आहे, पण असं काहीही घडलेलं नव्हतं.
रील विरुद्ध रिअल
दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडलसाठी गीताचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अँजेलिनासोबत झाला होता, असा सीन सिनेमात आहे. पण प्रत्यक्षात गीताच्या प्रतिस्पर्धीचं नाव एमिली बेन्स्टेड होतं. अशाचप्रकारे सिनेमात गीताच्या प्रशिक्षकाचं नाव प्रमोद कदम दाखवण्यात आलं आहे. तर गेम्सदरम्यान महिला संघाचे प्रशिक्षक प्यारा राम सोंधी होते. क्लायमॅक्समध्ये अंतिम सामना अटीतटीचा दाखवला आहे. पण प्रत्यक्षात गीताने हा सामना एकतर्फी जिंकला होता. फायनल फाईट 8-0 ने जिंकून गीताने सुवर्णपदक मिळवलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement