Funral : 'फनरल'चा डंका सातासमुद्रापार, 10 जूनला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Funral : 'फनरल' हा सिनेमा 10 जूनला प्रदर्शित होणार आहे.
Funral : आंतरराष्ट्रीय पातळीवर 'फनरल' (Funral) या सिनेमाने आपला झेंडा अभिमानाने फडकवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 10 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे यांसारखे दर्जेदार कलाकार या सिनेमात आहेत.
‘माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा तो रडत येतो आणि सारं जग आनंदी होतं. पण जेव्हा तो जातो, तेव्हा तो शांत होतो आणि सारं जग रडतं. हीच जगरहाटी आहे. थोडक्यात काय तर... ‘जगू आनंदे आणि निघू आनंदे! हा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या सिनेमाने केले आहे.
View this post on Instagram
निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ सिनेमाच्या स्वरूपात मांडली आहे. ‘मृत्यु हा अशुभ नसून अमूल्य आहे’, त्यामुळे प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला त्याचा शेवटचा सन्मान ही यथायोग्य पद्धतीने मिळायला हवा या विचाराने काम करणारे ताडदेव पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल श्री.ज्ञानदेव वारे यांच्या हस्ते ‘फनरल’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
संबंधित बातम्या