Gangubai Kathiawadi : गंगूबाईचा नवा रेकॉर्ड; नेटफ्लिक्सवरदेखील आलिया भट्टचा बोलबाला
Gangubai Kathiawadi : आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे.
Gangubai Kathiawadi : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. नुकताच आलियाचा गंगूबाई काठियावाडी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता नेटफ्लिक्सवरदेखील या सिनेमाने रेकॉर्ड केला आहे. आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही बातमी दिली आहे.
आलियाचा गंगूबाई काठिवाडी सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिकसवरील पहिला नॉन इंग्लिश सिनेमा ठरला आहे. 25 देशांत हा सिनेमा टॉप 10 मध्ये आहे. त्यामुळेच गंगूबाई काठियावाडी सिनेमा जगभरातील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
गंगूबाई काठियावाडी सिनेमा 22 एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय लीला भन्साळींनी सांभाळली आहे. या सिनेमात आलिया भट्टसोबत अजय देवगण, विजय राज, शांतनु माहेश्वरी आणि सीमा पाहवा, जिम सभ्र यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
View this post on Instagram
संबंधित बातम्या