Salman khan Throwback Photo: फोटोमध्ये सलमानसोबत पोज देणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत?
फोटोमधील ही लहान मुलगी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल
Salman khan Throwback Photo : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 'आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील?', असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो. नुकताच अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan) दिसत आहे. फोटोमधील लहान मुलगी ही अभिनेत्री दिव्या दत्ता (Divya Dutta) आहे. दिव्याने सलमान खानसोबतचा जूना फोटो शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिले.
दिव्या दत्ताची पोस्ट
सलमानसोबतचा जूना फोटो शेअर करून सलमाननं त्याला कॅप्शन दिलं, ' जेव्हा मी आणि राहूल. एस. दत्ता सुट्टीसाठी मुंबईला गेलो होतो. तेव्हा आम्ही आमच्या आवडत्या स्टारला म्हणजेच सलमान खानला भेटलो. फोटोमधील माझी एक्साइटमेंट पाहा. त्यानंतर काही वर्षांने मी सलमानसोबत चित्रपटामध्ये काम केले. '
Found a major throwback! Wen we visited Mumbai in our summer vacations and me n @drrahulsdutta got our pics clicked with my ever fav @BeingSalmanKhan .look at my excited expression! A few years later i shared screen space with him.. life. #thestarsinmysky pic.twitter.com/ycpKhT3tHR
— Divya Dutta (@divyadutta25) January 3, 2022
दिव्या दत्ता आणि सलमान खान यांनी वीरगती आणि बागबान या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. लवकरच सलमानचा टायगर-3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच किक आणि कभी ईद कभी दिवाली या सलमानच्या आगामी चित्रपटांची देखील त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या
AR Rahman Daughter Engagement : ए.आर.रेहमानच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; कोण आहेत रेहमानचे जावई?
The Kapil Sharma Show : भारती, कृष्णा अन् अर्चना; कपिल शर्मा शोच्या कलाकारांचे मानधन माहितेय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha